गेल्या दोन वर्षात विराट कोहलीने (Virat Kohli) फलंदाजीत उत्तम कामगिरी करत आहे, परंतु गेल्या दोन वर्षात एकही शतक झळकावले नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याने ईडन गार्डन्सवर बांगलादेशविरुद्ध (IND VS BAN) डे-नाईट कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. तेव्हापासून संपूर्ण जग कोहलीच्या ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकाची वाट पाहत आहे. पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या काही चाहत्यांनीही आपल्या इच्छा व्यक्त केल्या आहेत.
सध्या रावळपिंडीत यजमान पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचलेल्या काही प्रेक्षकांनी त्यांच्यासोबत विराट कोहलीच्या नावाचे पोस्टर आणले होते, ज्यावर लिहिले होते, “आम्हाला तुझे ७१वे शतक पाकिस्तानमध्ये हवे आहे.” एका बॅनरवर लिहिले होते की, “सर्वात मोठा सामना, २३ ऑक्टोबर २०२२, भारत विरुद्ध पाकिस्तान, रोहित विरुद्ध शाहीन शाह आफ्रिदी.” हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. चाहते विराटच्या ७१ व्या शतकासाठी खूप उत्सुक असल्याचे दिसत आहे.
Some Virat Kohli fans have made a wish during Rawalpindi Test at Pindi Cricket Stadium #PAKvAUS pic.twitter.com/mrKEaPFQEe
— Arfa Feroz Zake (@ArfaSays_) March 6, 2022
विराटने आजपर्यंत पाकिस्तानमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. कारण, भारताने २००८ मध्ये पाकिस्तानचा शेवटचा दौरा केला होता. त्यावेळी कोहली भारतीय संघाचा भाग नव्हता. आता चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे गेल्या दशकात कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. त्यामुळे विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषक यासारख्या आयसीसी स्पर्धांमध्येच दोन संघ आमने-सामने येतात.
रावळपिंडी कसोटीबाबत बोलायचं झालं, तर सोमवारी (७ मार्च) खेळाच्या चौथ्या दिवशी हवामान पूर्णपणे खराब झाले आहे. पाकिस्तानने पहिला डाव ४७६ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने २ गडी गमावून २७१ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया संघ २४ वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दोन संघांमध्ये कसोटी, टी२० आणि एकदिवसीय मालिका खेळल्या जाणार आहेत. सध्या या दोन संघांमध्ये कसोटी मालिका सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मुलाखत घेताना मला खेळाडूंची भिती वाटायची, ते मला…’, स्पोर्ट्स अँकरचा क्रिकेटपटूंबद्दल मोठा खुलासा
महान फलंदाज गावसकरांनी शेन वॉर्नबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य; भडकली ऑस्ट्रेलियन मीडिया





