---Advertisement---

‘विराट कोहलीला फलंदाजी कशी करायची हे नाही सांगू शकत’, न्यूझीलंडच्या माजी दिग्गजाचं वक्तव्य

On: शुक्रवार, मार्च 4, 2022 7:58 PM
Virat-Kohli
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना हा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) खास होता कारण त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना होता. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात शुक्रवारी (०४ मार्च) विराट ४५ धावा करून बाद झाला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके झळकावली आहेत. सर्वाधिक शतके ठोकणारा तो तिसरा फलंदाज ठरला. तो मागील वर्षापर्यंत आयपीएलमध्ये (IPL) आरसीबी (RCB) संघाचा कर्णधार होता, परंतु यावेळी तो कर्णधार नसणार आहे. आरसीबी संघाचे संचालन निदेशक माईक हेसन (Mike Hesson) यांनी आता विराट कोहलीचे कौतुक केले आहे.

हेसन यांच्या मते, विराट कोहलीसारख्या खेळाडूंना फलंदाजी करायला कोणीही शिकवू शकत नाही. आधीच माहिती असलेल्या पैलूंमध्ये भर घालणे हे त्याला माहितीये. २०१९ पासून आरसीबी संघासोबत जोडलेल्या माईक हेसन यांनी विराट कोहली आणि एबी डिविलियर्ससोबत काम केले आहे. कोहलीसारख्या खेळाडूंसोबत काम करण्याचा संदर्भ देताना हेसन यांनी आरसीबी पॉडकास्टमध्ये सांगितले की, “नक्कीच तुम्ही त्याला फलंदाजी कशी करावी हे सांगू शकत नाही. ही तुम्ही केलेली शेवटची गोष्ट असेल. तुम्हाला असे पैलू जोडावे लागतील, जे त्याला अगोदरपासूनच माहित आहेत.”

इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा हंगाम २६ मार्चपासून मुंबई आणि पुण्यात खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी आयपीएलचा मोगा लिलाव पार पडला. गेल्या हंगामापर्यंत आरसीबीचे नेतृत्व करणाऱ्या कोहलीला यावर्षी फ्रँचायझीने कायम ठेवले आहे. न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक असलेले हेसन म्हणाले, “जेव्हा तुम्ही स्पर्धेत खेळता, तेव्हा तुम्हाला वाटत नाही की, एखाद्या खेळाडूच्या तंत्राबद्दल अनिश्चितता निर्माण केली जावी.”

माईक हेसन म्हणाले, “म्हणून आमची बहुतांश कोचिंग किंवा चर्चा या गोष्टीवर होते की, तुम्हाला असे काही दिसते की जे योग्य नाही, तुम्हाला काही काळ पाहावे लागेल. तसेच नंतर तुम्हीही प्रश्न विचाराल. कारण, तो काही कारणांंमुळे महान खेळाडू आहे.”

विराट कोहलीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १०० कसोटी सामने, २६० वनडे सामने आणि ९७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ५०.३६ च्या सरासरीने ८००७ धावा, वनडेत ६८.०७ च्या सरासरीने १२३११ धावा आणि आंतरराष्ट्रीय टी२०त ५१.५० च्या सरासरीने ३२९६ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! ‘इतक्या’ चाहत्यांना आयपीएल सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मिळणार प्रवेश

विराटचा १०० व्या कसोटीत बीसीसीआय अध्यक्षांच्या विक्रमालाच धक्का, पाहा काय केलाय कारनामा

कोण आहे पाकिस्तानचा युवा सलामीवीर, ज्याने चक्क कमिन्सला फोडला घाम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---