इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. तर लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १५१ धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे २५ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात कुठलाही बदल पाहायला मिळणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु, माजी भारतीय क्रिकेटपटूंनी तिसऱ्या कसोटी सामन्यात एक महत्वाचा बदल करण्याचा सल्ला दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाचे प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. ज्यामुळे त्यांना संघातून बाहेर करण्याची मागणी जोर धरत आहे. या दोघांनी लॉर्ड्स कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात महत्वपूर्ण भागीदारी करून भारतीय संघाची सामन्यातील पकड मजबूत करून दिली होती. परंतु माजी भारतीय यष्टिरक्षक फलंदाज फारुख इंजिनियर यांचे स्पष्ट मत आहे की, तिसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे किंवा चेतेश्वर पुजाराच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी मिळायला हवी.
फारुख इंजिनियर यांनी स्पोर्ट्सतक सोबत बोलताना म्हटले की, “मी हेडिंग्ले कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा किंवा अजिंक्य राहणेच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी दिली असती. मी त्याचा खूप मोठा चाहता आहे. तो एक क्लास खेळाडू आहे. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे अप्रतिम फलंदाज आहेत. परंतु, सूर्यकुमार यादव सामना जिंकून देणारा फलंदाज आहे. त्याला संघात संधी मिळायला हवी.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “सूर्यकुमार यादव हा एक आक्रमक फलंदाज आहे.तो जलद गतीने धावा करू शकतो. तसेच आवश्यकता भासल्यास तो शतक देखील झळकावू शकतो.तसेच तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे. अशातच जर विराट कोहलीने त्याला हेडिंग्ले कसोटीत संधी दिली तर,तो भारतीय संघासाठी हुकुमचा एक्का ठरू शकतो.”(Farokh engineer backed suryakumar yadav over Cheteshwar pujara and Ajinkya Rahane for headingley test)
वनडे आणि टी -२० पदार्पणात सूर्यकुमार यादवची अप्रतिम कामगिरी
सूर्यकुमार यादवने याच वर्षी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. त्याला इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. पदार्पणाच्या सामन्यात त्याने तुफानी अर्धशतक झळकावले होते. तसेच नुकताच श्रीलंका संघाविरुद्ध पार पडलेल्या वनडे मालिकेत त्याला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. आता इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत देखील त्याला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कारणामुळे १० वर्षांपूर्वी आजचा दिवस महेंद्रसिंग धोनीसाठी ठरला होता काळा दिवस
अष्टपैलू हार्दिक पंड्याला टी२० विश्वचषकात मिळणार का संधी? गोलंदाजी प्रशिक्षकाने दिले उत्तर