टी20 विश्वचषक तोंडावर आला आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे. भारतीय वेगवान गोलंदाजी फळीची मोठी जबाबदारी पार पाडणारा जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशात भारतीय संघ व्यवस्थापन त्याच्या बदली खेळाडूच्या शोधात आहे. बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा मुख्य संघात सामील होण्यासाठी दावेदार बनला आहे. संघ व्यवस्थापनही त्याच्यावर पैज लावण्याच्या प्रयत्नात आहे, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेपूर्वी शमी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपर्यंत तो बरा झाला नव्हता.
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा या आठवड्यात बंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (National Cricket Academy) तंदुरुस्ती चाचणी देईल. यानंतर तो ऑस्ट्रेलियासाठी जाणाऱ्या भारतीय ताफ्यात सामील होईल.
मोहम्मद शमी मागच्या वेळी इंग्लंडविरुद्ध 17 जुलै रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे एका प्रतिस्पर्धी सामन्यात झळकला होता. भारतासाठी 17 सामने खेळलेला शमी कोरोनातून बरा झाला आहे. तसेच, तो सराव करतानाही दिसला होता. काही दिवसांपूर्वी त्याने इंस्टाग्रामवर आपल्या फार्महाऊसवर गोलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. शमीच्या पुनरागमनासाठी भारतीय संघाला कोणतीही घाई करायची नाहीये, त्यामुळे त्याला ताजेतवाने ठेवण्यासाठी थेट ऑस्ट्रेलियाला रवाना केले जाईल. तिथे गेल्यानंतर तो सराव सामन्यात आपला जलवा दाखवेल.
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय संघ 6 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. त्यापूर्वी शमी एनसीएमध्ये तंदुरुस्तीची चाचणी देईल. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी फिट आहे की, नाही यावर निर्णय घेतला जाईल.
https://www.instagram.com/p/CjLWoxtJFXt/
माध्यमांनी बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने लिहिले की, “शमी तंदुरुस्त होत आहे. त्याने थोडा फार सराव करण्यास सुरुवातही केली आहे. त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी वेळ पाहिजे. तो या आठवड्यात एनसीएमध्ये चाचणी देईल. त्यानंतर त्याला वैद्यकीय पथकाची मंजुरी घ्यावी लागेल आणि मग तो भारतीय संघाचा भाग बनू शकेल.”
आता मोहम्मद शमी तंदुरुस्ती चाचणी पूर्ण करत ऑस्ट्रेलियाला जातो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऐन विश्वचषकापूर्वी सूर्याचा चौथा क्रमांक धोक्यात! स्वतःच व्यक्त केली भीती
VIDEO। रोहित शर्माचे सूर्यकुमारबाबत चकीत करणारे विधान; म्हणाला, ‘मला त्याच्या फॉर्मची चिंता’