टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दोन दिवस आधी मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान खतरनाक गोलंदाज मोहम्मद शमी टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. त्याला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. बुमराह पाठीच्या दुखापतीमुले स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशात या बातमीने भारतीय संघासोबतच चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. बीसीसीआयने ट्वीट करत याची माहिती दिली आहे.
मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने मागील काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) म्हणजेच एनसीएमध्ये फिटनेस चाचणी पास केली होती. बुधवारी (दि. 12 ऑक्टोबर) शमी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता. विशेष म्हणजे, शमी मागील विश्वचषकानंतर थेट या विश्वचषकात खेळताना दिसणार आहे.
🚨 NEWS 🚨: Shami replaces Bumrah In India’s ICC Men’s T20 World Cup Squad. #TeamIndia | #T20WorldCup
Details 🔽https://t.co/nVovMwmWpI
— BCCI (@BCCI) October 14, 2022
विश्वचषकातील भारतीय संघाचा पहिला सामना
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) स्पर्धेची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून होत आहे. यातील भारतीय संघाचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. शमी मागील 2021च्या विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होता. त्यानंतर त्याने कोणतेही टी20 सामने खेळले नाहीत. यावेळी शमी विश्वचषकात रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. स्पर्धेत एकूण 16 संघांचा समावेश आहे.
बीसीसीआयकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सचिव जय शाह यांनी सांगितेल की, निवड समितीने मोहम्म शमी याला बुमराहच्या जागी संघात सामील केले आहे. तो ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. तसेच, तो वॉर्मअप सामन्यापूर्वी भारतीय संघात सामील होईल. याव्यतिरिक्त मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे राखीव खेळाडू म्हणून संघात आहेत. दोघेही लवकर ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), दीपक हुड्डा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, आर अश्विन, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबो! भारत अन् पाकिस्ताननंतर आता ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड बनला चाहत्यांचा आवडता सामना, सर्व तिकिटांची विक्री
‘हुड्डा आ जाएगा मैं चला…’, हे काय बोलून गेला विराट? व्हिडिओ व्हायरल