भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. हा सामना नागपूरमध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी संपूर्ण भारतीय संघ नागपूरमध्ये पोहोचला आहे. अशातच भारतीय संघाचा एक खेळाडू सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा खेळाडू त्याच्या कामगिरीसाठी चर्चेत असतोच, पण आता त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या चाहतीचीच चर्चा रंगली आहे. अशातच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव यानेही त्याची मजा घेतली आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल आहे. शुबमनच्या चाहतीची मागणी पाहून इतर लोकही खुश झाले आहेत.
उमेश यादवने केली शुबमन गिलची चेष्टा
नुकतीच भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे आणि टी20 मालिका पार पडली. यातील तिसरा टी20 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पार पडला. यादरम्यानच्या एका घटनेमुळे शुबमन गिल (Shubman Gill) भलताच चर्चेत आहे. तिसऱ्या टी20त फलंदाजी करत होता. त्याचवेळी स्टेडिअममध्ये एक मुलगी होर्डिंग घेऊन दिसली. त्यावर लिहिले होते की, “टिंडर, शुबमन गिल से मॅच करवा दो.” म्हणजेच, टिंडर (Tinder) शुबमन गिलसोबत जुळवून दे. हा फोटो जसा सोशल मीडियावर आला, तसा जोरदार व्हायरल झाला.
यानंतर टिंडरने नागपूर (Nagpur) येथे अनेक ठिकाणी त्यांचे होर्डिंग्स लावले. टिंडरने या होर्डिंग्समध्ये व्हायरल फोटोसोबत लिहिले होते की, “शुबमन इधर तो देखो.” हे सर्व होर्डिंग्स पाहून भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) याने गिलची खिल्ली उडवत म्हटले की, “संपूर्ण नागपूर म्हणत आहे, शुबमन गिल आतातरी पाहून घे.” या ट्वीटनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर चांगलीच मजा घेतली आहे.
Poora Nagpur bol raha hai, @ShubmanGill ab toh dekh le pic.twitter.com/9iaW2BBtZY
— Umesh Yaadav (@y_umesh) February 3, 2023
विशेष म्हणजे, शुबमन गिलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पाहिलं की, आता तुम्ही पाहा नीट.”
https://www.instagram.com/p/CoPexsoMQN5/?hl=en
शुबमन गिल जबरदस्त फॉर्मात
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासूनच शुबमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातच त्याने त्याचा इरादा स्पष्ट केला होता. तोच इरादा प्रत्येक सामन्यात पाहायला मिळाला. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात द्विशतक झळकावले होते. त्याने यादरम्यान 208 धावांची खेळी साकारली होती. यानंतर दुसऱ्या वनडेत त्याने 40 धावा केल्या होत्या. तसेच, मालिकेच्या अखेरच्या सामन्यात शतक झळकावत 112 धावांची खेळी केली होती.
तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने टी20 मालिकेतही धावांचा पाऊस पाडला. पहिल्या आणि दुसऱ्या टी20त त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, अखेरच्या निर्णायक सामन्यात त्याने 63 चेंडूत 126 धावांचा पाऊस पाडत शतक ठोकले. अशाप्रकारे तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकावणारा भारतीय खेळाडू बनला. (fast bowler umesh yadav fiercely pulled shubman gills leg posted the viral photo and said this read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूने घेतली निवृत्ती, पोस्ट शेअर करत दिली माहिती
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीआधी समजली ऑस्ट्रेलियाची मोठी कमजोरी, दिग्गजाकडून माहितीचा खुलासा