क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज वेगवान गोलंदाज होऊन गेले. यामधील अनेक गोलंदाजांसाठी वेगासह गोलंदाजीतील विविधता महत्त्वाची ठरली. पण अनेक गोलंदाजांसाठी वेग हेच त्यांचे सर्वात महत्त्वाचे अस्त्र राहिले आहे. त्यांचा वेग इतका असायचा की फलंदाजांना चेंडू दिसण्यासही कठीण जायचा. अशाच सर्वात वेगात चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांचा घेतलेला हा आढावा –
१०. शेन बॉन्ड – न्यूझीलंडचा हा वेगवान गोलंदाज त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातील त्याच्या वेगामुळे चर्चेत आला. पण त्याला सातत्याने झालेल्या अनेक दुखापतींमुळे त्याची कारकिर्द मोठी झाली नाही. पण तरीही तो एक चांगल्या वेगवान गोलंदाजांमध्ये गणला जातो.
त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान चेंडू २००३ वनडे विश्वचषकात टाकला होता. त्याने त्या विश्वचषकाच १५६.४ किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता.
९. मोहम्मद सामी – पाकिस्तान क्रिकेटमधील सामी हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वेगवान गोलंदाज. तो त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच प्रकाशझोतात आला होता. पण त्याच्याही कारकिर्दीत दुखापतींमुळे अडथळा येत राहिला. तसेच नंतर त्याचा फॉर्मही खराब होत गेला. त्यामुळे तो दीर्घकाळ त्याच्या कारकिर्द घडवू शकला नाही.
त्याने एप्रिल २००३मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध त्याचा वैयक्तीत सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. त्याने १५६.४ किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता.
८. मिशेल जॉन्सन – ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज वेगवान गोलंदाजांमध्ये जॉन्सनची गणना होते. तो कसोटीबरोबरच वनडे क्रिकेटमध्येही यशस्वी ठरला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५९० विकेट्स घेतल्या आहेत. तसेच इंग्लंडविरुद्ध त्याची कामगिरी सर्वाधिक बहरली.
त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान चेंडूही इंग्लंड विरुद्धच टाकला. त्याने २०१३ ला डिसेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध १५६.८ किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता.
७. फिल्ड एडवर्ड्स – वेस्ट इंडिजच्या क्रिकेटमध्ये फिल्ड एडवर्ड हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वेगवान गोलंदाज आहे. त्याने २००३ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान चेंडू टाकला. त्याने १५७.७ किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता.
६. अँडी रॉबर्ट्स – ७० च्या दशकातील वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेले अँडी रॉबर्ट्स. ते वेस्ट इंडीजचे सर्वात वेगवान गोलंदाज आहेत. त्यांनी १९७५ला पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५९.५ किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता. हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान चेंडू होता.
५. मिशेल स्टार्क – ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज गोलंदाजांमधील मिशेल स्टार्क हे आणखी एक मोठे नाव. त्याने अनेकदा त्याच्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला मोठे विजय मिळवून दिले आहेत. त्याने २०१५ ला न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळताना रॉस टेलर विरुद्ध १६०.४ किलोमीटर प्रति तास योगाने यॉर्कर टाकत बाद केले होते. तो त्याचा सर्वात वेगवान चेंडू होता.
४. जेफ थॉमसन – ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन हा नेहमीच त्याच्या वेगासाठी ओळखला गेला. त्याच्या काळातील तो सर्वात वेगवान गोलंदाज होता. त्याने १९७५ला पर्थ येथे वेस्ट इंडिजविरुद्ध १६०.६ किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता. हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान चेंडू होता.
३. शॉन टेट – २००७ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या शॉन टेटने त्याच्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. पण सातत्याने होणाऱ्या दुखापतींमुळे त्याने २८ व्या वर्षीच २०११ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
त्याने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना इंग्लंडविरुद्ध १६१.१ किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान चेंडू होता.
२. ब्रेट ली – केवळ ऑस्ट्रेलियाचाच नाही तर जगातील दिग्गज गोलंदाजांमध्ये ब्रेट लीचे नाव घेतले जाते. त्याच्याकडे असलेला वेग हे त्याचे महत्त्वाचे अस्त्र होते. त्याची विकेट्स मिळवण्याची क्षमताही अफलातून होती. ब्रेट लीने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान चेंडू २००३ ला ब्रिस्बेन येथे वेस्ट इंडिज विरुद्ध टाकला होता. त्याने १६१.८ किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता.
पण चॅनेल नाईनने नंतर स्पष्ट केले की त्यांच्याकडून त्याचा वेग मोजण्यात चूक झाली. नंतर त्याचा सर्वात वेगवान चेंडू हा १६१.१ किलोमीटर प्रति तास वेग असा अधिकृतरित्या नोंदवला गेला आहे. हा चेंडू त्याने २००५ ला न्यूझीलंड विरुद्ध टाकला होता.
१. शोएब अख्तर – पाकिस्तानचा ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ म्हणून ओळखला जाणारा शोएब अख्तर हा जगातील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. त्याने २००३ च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध १६१.३ किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता. हा आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू ठरला होता.
तो साधारणत: कारकिर्दीत खेळताना १४५ ते १५० किलोमीटर प्रतितास एवढा वेगाने चेंडू टाकायचा.
ट्रेडिंग घडामोडी –
जगातील सर्वात उंच ५ क्रिकेटपटू, पहिल्या क्रमांकावरील क्रिकेटपटू उंची ऐकून व्हाल अवाक्
जगातील टाॅप ५ श्रीमंत क्रिकेट लीग, जिथे क्रिकेटर्स होतात करोडपती
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही धावला कोरोना बाधितांच्या मदतीसाठी
अशा क्रिकेट टीम ज्यांच्या नावात येतात प्राण्यांची विचित्र नाव
कॅप्टन कूल धोनीच्या चेन्नईला सतत त्रास देणारे हे ३ खेळाडू