जगभरातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यातील ६ वा सामना गुरूवारी (२४ सप्टेंबर) किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत आरसीबीचा कर्णधार विराटने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असून पंजाब संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.
पंजाब संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला कर्णधार केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. या सामन्यात त्याने एक खास विक्रम केला. त्याने १४ चेंडूत १९ धावा करत आयपीएलमध्ये कमी डावात सर्वात वेगवान २००० धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केल्या. हा कारनामा त्याने ६० डावांमध्ये पूर्ण केला आहे. राहुलने आपल्या २००० धावा पूर्ण करताना पहिल्या २७ सामन्यांमध्ये ३५८ धावा, तर पुढील १६४२ धावा त्याने ४२ सामन्यांत पूर्ण केल्या.
याबाबतीत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि शेन वॉटसन सारख्या दिग्गजांनाही मागे टाकले आहे. सचिनला हा कारनामा करण्यासाठी ६३ डाव, तर वॉटसनला ६४ डावांची आवश्यकता लागली होती.
कमी डावात सर्वात वेगवान २००० धावा करण्याचा विक्रम हा ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने केवळ ४८ डावांमध्ये हा कारनामा केला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शॉन मार्श आहे. त्याने ५२ डावांमध्ये सर्वात वेगवान २००० धावा केल्या आहेत.
राहुलने आयपीएलमध्ये आतापर्यंत ६९ सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-गोलंदाजीत फसला म्हणून काय झालं? फलंदाजी करताना ठोकले सलग ४ षटकार
-दिग्गज क्रिकेटपटूंच्या बायका आयपीएल दरम्यान घेतात ड्रग्स, पहा कुणी केलाय आरोप
-दिल्ली संघाचा ‘हा’ वेगवान गोलंदाज जखमी, पुढील एक- दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता
ट्रेंडिंग लेख-
-चेन्नईच्या रखरखत्या उन्हात डीन जोन्सनी केली होती भारताविरुद्ध अफलातून खेळी
-आयपीएलमध्ये एकाच षटकात ३० किंवा त्याहून अधिक धावा देणारे ७ गोलंदाज
-कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणारे जगातील ३ सर्वोत्तम फलंदाज