साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी कर्णधार विराट कोहली एक जबरदस्त खेळी खेळत आहे.
१३० चेंडूत ५८ धावा करत विराट तंबुत परतला. वरच्या फळीतील तीनही फलंदाज सपशेल फेल ठरले असताना विराट आणि मुंबईकर अजिंक्य रहाणेने चांगला लढवुन भारताला सुस्थितीत आणले होते.
या सामन्यात आजच्या दुसऱ्या सत्रात विराटने अनेक पराक्रमही केले आहेत. त्यातील काही निवडक पराक्रम-
-कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान ४००० धावा करणारा विराट जगातील पहिला कर्णधार. विराटने ६५ कसोटी डावात ४ हजार धावा केल्या आहेत तर ब्रायन लाराने ७१ डावात हा पराक्रम केला होता.
– कसोटीत कर्णधार असताना ४ हजार धावा करताना विराटची सरासरी ६५च्या पुढे राहिली आहे. जगातील ही सर्वोत्तम सरासरी आहे.
-कसोटी मालिकेत इंग्लंडमध्ये ५०० किंवा अधिक धावा करणारा विराट केवळ तिसरा भारतीय. यापुर्वी राहुल द्रविड (६०२) आणि सुनिल गावसकर (५४२ ) यांनी हा पराक्रम केला आहे. विराटने या मालिकेत आतापर्यंत ५४४ धावा केल्या आहेत.
-इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत ५०० धावा करणारा विराट आशिया खंडातील पहिलाच कर्णधार.तर जगातील केवळ ६वा कर्णधार
-विराटने याचवर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ८०० धावा केल्या होत्या. त्यापाठोपाठ या दौऱ्यातही त्याने ८०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कसोटीत ५४४, वनडेत १९१ आणि टी२०मध्ये ११० अशा त्याने ८४३ धावा केल्या आहेत.
-विराटने तिसऱ्यांदा कसोटी मालिकेत कर्णधार असताना ५०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यापुर्वी असा पराक्रम सर डाॅन ब्रॅडमन आणि ब्रायन लारा यांनी ४ वेळा तर सर गॅरी सोबर्स यांनी ३ वेळा केला आहे.
-विराटने खेळाडू म्हणुन चौथ्यांदा कसोटी मालिकेत ५०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
-परदेशात चौथ्या डावात विराटने ६व्यांदा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यापुर्वी भारताकडून सुनिल गावसकर (९) आणि राहुल द्रविड(६) यांनी हा विक्रम केला आहे.
-परदेशात विराटचे हे ५० वे अांतरराष्ट्रीय अर्धशतक आहे.