विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 33व्या सामन्यात वानखेडे स्टेडिअमवर भारतीय संघाला पहिल्याच षटकात धक्का बसला. श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताकडून रोहित शर्मा पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या स्थानी विराट कोहली याने मैदानावर पाऊल ठेवले. यावेळी विराटने 18 धावांचा टप्पा पार करताच त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
विराट कोहलीचा विक्रम
श्रीलंकेविरुद्ध खेळताना विराट कोहली (Virat Kohli) याने 6व्या षटकापर्यंत 22 चेंडूंचा सामना करत आपल्या 18 धावा पूर्ण केल्या. यामध्ये 4 चौकारांचा समावेश होता. विराटने या धावा करताच त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. तो आशिया खंडात वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 8000 धावा करणारा (Fastest to reach 8000 ODI runs in Asia) अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरला. त्याने 159 डावात हा पराक्रम केला. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 33 शतके आणि 35 अर्धशतकेही निघाली आहेत.
विराटपूर्वी आशियात वनडे क्रिकेटमध्ये जलद 8000 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर आहे. त्याने 188 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. तसेच, श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकारा तिसऱ्या स्थानी असून त्याने 213 डावात ही कामगिरी केली होती, तर चौथ्या स्थानी श्रीलंकेचाच फलंदाज सनथ जयसूर्या असून त्याने 254 डावात ही जलद 8000 धावा केल्या होत्या.
आशिया खंडात वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 8000 धावा करणारे खेळाडू (डावानुसार)
159 डाव- विराट कोहली*
188 डाव- सचिन तेंडुलकर
213 डाव- कुमार संगकारा
254 डाव- सनथ जयसूर्या
आशियामध्ये वनडेत सर्वाधिक धावा
आशिया खंडात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे. त्याने 12067 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी सनथ जयसूर्या असून त्याच्या नावावर 8448 धावांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी कुमार संगकारा आहे. त्याने आशियात 8249 धावा केल्या आहेत. यानंतर विराट कोहली चौथ्या स्थानी असून त्याच्या नावावर 8010* धावा आहेत. (Fastest to reach 8000 ODI runs in Asia ind vs sl cwc 23)
आशिया खंडात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
12067 – सचिन तेंडुलकर
8448 – सनथ जयसूर्या
8249 – कुमार संगकारा
8010 – विराट कोहली*
हेही वाचा-
वानखेडेवर श्रीलंकेने भारताला दिलं फलंदाजीचं आमंत्रण, रोहितसेनेत कोणताही बदल नाही; पाहा Playing XI
CWC 23: पंड्याच्या पुनरागमनाविषयी रोहितने दिली मोठी माहिती, म्हणाला, ‘आम्हाला दरदिवशी…’