मुंबई | प्रो-कबड्डीचा आजवरचा विक्रम मोडीत काढत यु-मुंबाने प्रो-कबड्डीमध्ये इराणच्या फजल अत्राचलीला चक्क 1 कोटी रुपये मोजले.
यावेळी यु-मुंबा आणि जयपुर पिंक पॅंथरने मोठ्या प्रमाणावर बोली लावल्या. त्यात यु-मुंबाने चक्क दोन वेळा ही बोली 20 लाखांनी वाढवली.
त्याचा जुना संघ गुजरातने त्याला रिटेन करण्यात सारस्य दाखवले नाही. त्यामुळे हा खेळाडू यु-मुंबाच्या ताफ्यात आला.
प्रो कबड्डी मधील लिलावाचची आजवरची विक्रमी बोली मोडीत काढत फझल अत्राचलीला #UMumba ने तब्बल १ कोटी ला विकत घेतले @Maha_Sports pic.twitter.com/GlLjbE7gOm
— Chinmay Remane (@ChinmayRemane) May 30, 2018
याबरोबर तो प्रो-कबड्डीमधील पहिला असा खेळाडू ठरला ज्याने कोटींचा आकडा पार केला. हा खेळाडू बचाव फळीत डाव्या बाजूला खेळतो. 56सामन्यात 152 गुण त्याने टॅकलमधून मिळवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली
–या दिग्गज माजी खेळाडूची पुणेरी पलटणच्या प्रशिक्षकपदी निवड
–महाराष्ट्राच्या या तीन खेळाडूंवर लागु शकते प्रो-कबड्डीत सर्वाधिक बोली
–संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध
–आयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लिलावातही वापरता येणार आरटीएम
–कबड्डी- ई भास्करन तमिल थलाइवाजचे मुख्य प्रशिक्षक
–प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम