एफसी गोवा संघाने हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३च्या (आयएसएल) आजच्या सामन्यात घरच्या मैदानावर विजय मिळवला. यजमान गोवा संघाने ३-० अशा फरकाने एटीके मोहन बागानवर विजय मिळवत वेगळाच पराक्रम नावावर केला. एफसी गोवा संघाचा आयएसएलमधील एटीके मोहन बागानवरील पहिला विजय ठरला. एफसी गोवा संघाने सुरुवात दणक्यात केली आणि पहिल्या ७ मिनिटांत ४ ऑन टार्गेट प्रयत्न केले. एटीके मोहन बागानच्या ताफ्यात गोंधळ होता, परंतु त्यांनी स्वतःला सावरून पहिल्या हाफमध्ये यजमानांना गोल करू दिला नाही. पण, दुसऱ्या हाफमध्ये एबान डॉहलिंग ( ५० मि.), मोहम्मद फॅरेस ( ७६ मि.) व नोआ सदौई (८२ मि. ) यांनी गोल करून एफसी गोवा संघाचा विजय पक्का केला.
उभय संघांमध्ये हिरो आयएसएलमधील चार सामने झाले आणि एटीके मोहन बागानने तीन जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला. दुसऱ्या मिनिटाला त्यांच्याकडून अल्व्हारो व्हॅझकेजचा ऑन टार्गेट प्रयत्न एटीकेचा गोलरक्षक विशाल कैथने रोखला. पाचव्या मिनिटाला गोवा संघाने काही सेकंदात दोन प्रयत्न केले आणि याही वेळेस विशाल कैथ त्यांच्यासमोर मजबूत बचाव करून उभा होता. एटीकेच्या बचावफळीवर गोवा संघाने दडपण निर्माण करण्यात यश मिळवले. ७व्या मिनिटाला आयकर गौरोत्सेनाचा ऑन टार्गेट प्रयत्न विशालने डाईव्ह मारून रोखला. या ७ मिनिटांच्या कालावधीत गोवा संघाने चार ऑन टार्गेट प्रयत्न केले. एटीकेने स्वतःला सावरताना लढत हळूहळू नियंत्रणात आणली. २२व्या मिनिटाला व्हॅझकेजने गोल केला, परंतु अन्वर अली ऑफ साईड पोझिशनवर आधीच गेल्याने हा गोल ग्राह्य धरला गेला नाही.
गोवा संघाकडून पुन्हा आक्रमण झालेले दिसले आणि ३१व्या मिनिटाला व्हॅझकेजला वन ऑन वन संधी मिळाली, परंतु आशिष रायने सुरेख बचाव केला. व्हॅझकेजने पुन्हा एकदा गोल करण्याची नामी संधी गमावली. गोवा संघाला एटीकेने टक्कर दिली. त्यांनीही पहिल्या हाफमध्ये तीन ऑन टार्गेट प्रयत्न केले, तर ५ प्रयत्न ऑफ टार्गेट राहिले. पहिल्या दहा मिनिटांत गोवाने जसा खेळ केला, तसा त्यांना पुढे करता आला नाही. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये ०-० अशीच बरोबरी राहिली. ५०व्या मिनिटाला अखेर गोवा संघाने खाते उघडले. अन्वर अलीने दिलेला पास एबान डॉहलिंगने एटीकेच्या आशिष रायला चकवून गोलजाळीत पाठवला. पेनल्टी बॉक्सच्या डाव्या कॉर्नरवरून एबानने टोलावलेला चेंडू गोलरक्षकाला रोखता आला नाही आणि गोवा संघाने १-० अशी आघाडी घेतली.
एटीकेला एक मोठा धक्का दुसऱ्या हाफमध्ये बसला, संघातील प्रमुख खेळाडू जॉनी काऊकोला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. ६०व्या मिनिटाला एटीकेचा बरोबरीचा गोल गोवा संघाचा गोलरक्षक धीरजने सहज रोखला. आक्रमणासोबतच यजमानांनी त्यांचा बचावही भक्कम ठेवताना एटीकेला हैराण केले. एटीकेचे खेळाडू गोल करण्याची संधी मिळत नसल्याने दडपणाखाली गेलेले दिसले. ६६व्या मिनिटाला ह्युगो बौमोसने गोवाच्या बचावपटूच्या चूकीचा फायदा उचलण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. गोवा संघाच्या बचावपटूंनी एटीकेच्या ह्युगो व लिस्टन कोलासो यांना संघासाठी काहीच करण्याची संधीच दिली नाही. ७६व्या मिनिटाल एडू बेडियाच्या पासवर मोहम्मद फॅरेसने हेडरद्वारे गोल करून गोवा संघाची आघाडी २-० अशी मजबूत केली.
Super Sunday. Super WIN 🧡
GETTTT IN, BOYS 💪🏻#ForcaGoa #UzzoOnceAgain #FCGATKMB #HeroISL pic.twitter.com/lr7qR8pAzd
— FC Goa (@FCGoaOfficial) November 20, 2022
फॅरेस ६५व्या मिनिटाला राखीव खेळाडू म्हणून मैदानावर उतरला होता. ८२व्या मिनिटाला नोआ सदौईने ३० यार्डवरून थेट प्रयत्न केला अन् एटीकेच्या गोलरक्षक विशालकडून चूक झाली आणि गोवा संघाला तिसरा गोल मिळाला. ८७व्या मिनिटाला सुभाशिष बोसने गोल केला, परंतु रेफरीने फाऊल दिल्याने एटीकेची पाटी कोरी राहिली. ५ मिनिटांच्या भरपाई वेळेत एटीकेला गोल करता आला नाही. एफसी गोवा संघाने या विजयासह तालिकेत १२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
निकाल : एफसी गोवा ३ ( एबान डॉहलिंग ५० मि., मोहम्मद फॅरेस ७६ मि., नोआ सदौई ८२ मि.) विजयी वि. एटीके मोहन बागान ०.FC Goa complete their first ever HERO ISL win against ATKMB to leap into third place
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ गोष्टीमुळे आम्ही हारलो, साउदीने पराभवाची कारणे देत केले सूर्यकुमारवर वक्तव्य
सूर्यकुमार बनू शकतो सर्वाधिक टी-20 धावा करणारा फलंदाज, पण करावी लागणार ख्रिस गेलासारखी खेळी