सध्या बिग बॅश लीग (Big bash league) २०२१ स्पर्धा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. या स्पर्धेत काही ना काही असा प्रकार घडत असतो. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. दरम्यान ब्रिस्बेन हिट (Brisbane heat) आणि सिडनी थंडर्स(Sidney thunders) यांच्यात झालेल्या सामन्यातील एका शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. व्हायरल होण्याचे कारण शॉट नव्हे, तर स्टेडियममध्ये उपस्थित एक महिला प्रेक्षक आहे.
बिग बॅश लीग स्पर्धेतील १४ वा सामना ब्रिस्बेन हिट आणि सिडनी थंडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात सिडनी थंडर्स संघाने ५३ धावांनी विजय मिळवला. ज्यामध्ये सिडनी थंडर्स संघाकडून सॅम बिलिंग्सने ६४ धावांची तुफानी खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ५ षटकार मारला. परंतु, एक षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(Sam Billings six video)
तर झाले असे की, सिडनी थंडर्स संघाची फलंदाजी सुरू असताना मुजीब उर रहमान गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी १५ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सॅम बिलिंग्सने स्टेप आऊट होऊन गगनचुंबी षटकार मारला. त्यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या महिला प्रेक्षकाने भन्नाट झेल टिपला. हा झेल टिपल्यानंतर त्या महिला प्रेक्षकाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. (Female spectator taken an unbelievable catch)
या सामन्यात ब्रिस्बेन हिट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सिडनी थंडर्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सॅम बिलिंग्सने ६४ धावांची तुफानी खेळी केली. तर जेसन संघाने ३९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर सिडनी थंडर्स संघाला ७ बाद १९६ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना ब्रिस्बेन हिट संघाला अवघ्या १४३ धावा करता आल्या. हा सामना सिडनी थंडर्स संघाने ५३ धावांनी विजय मिळवला. ब्रिस्बेन हिट संघाकडून झेवियर बार्टलेटने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. तर मार्क स्टीकेटीने ३३ धावांची खेळी केली.
महत्वाच्या बातम्या :
काय रे हे? या तिघांना पूर्ण कारकिर्दीत दुहेरी धावसंख्या गाठताना आले नाकीनऊ
दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पहिल्या घासाला खडा लागण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण






