---Advertisement---

हिटमॅन रोहित शर्माचे शतक हुकले पण हा मोठा विश्वविक्रम झाला नावावर!

On: रविवार, मार्च 10, 2019 3:42 PM
---Advertisement---

मोहाली। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(10 मार्च) चौथा वनडे सामना सुरु आहे. या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला योग्य ठरवत रोहित शर्मा आणि शिखर धवन या भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली आहे.

या दोघांनी मिळून 31 षटकात 193 धावांची सलामी भागीदारी रचली आहे. तसेच दोघांनीही अर्धशतकेही पूर्ण केली आहेत. त्याचबरोबर रोहितने एक खास विश्वविक्रमही आपल्या नावावर केला आहे.

रोहितने हे वनडे क्रिकेटमधील 40 वे अर्धशतक करताना मायदेशात वनडेमध्ये 3000 धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो भारताचा आठवा फलंदाज ठरला आहे. तसेच त्याने हा टप्पा मायदेशात खेळताना 57 व्या डावात पूर्ण केला आहे.

त्यामुळे तो वनडेमध्ये मायदेशात सर्वात जलद 3000 धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच त्याने हाशिम अमलाच्या मायदेशात सर्वात जलद 3000 धावा पूर्ण करण्याच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी केली आहे. अमलानेही दक्षिण आफ्रिकेमध्ये 3000 वनडे धावा 57 डावातच पूर्ण केल्या होत्या.

याआधी भारतात सर्वात 3000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. त्याने 63 डावात हा टप्पा पार केला होता.

मात्र रोहितचे 23 वे वनडे शतक केवळ 5 धावांनी हुकले आहे. त्याला 95 धावांवर झाय रिचर्डसनने बाद केले. रोहितने या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार मारले.

वनडेमध्ये मायदेशात सर्वात जलद 3000 धावा करणारे क्रिकेटपटू – 

57 डाव- रोहित शर्मा (भारत)

57 डाव – हाशिम अमला (दक्षिण आफ्रिका)

63 डाव – विराट कोहली (भारत)

69 डाव – सौरव गांगुली (भारत)

69 डाव मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड)

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडिया आणि एमएस धोनीच्या बाबतीत पहिल्यांदाच घडली ही घटना

चौथ्या वनडेसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

एवढं चांगल खेळत असूनही कोहलीसमोर आहे हे मोठं संकट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment