---Advertisement---

डेक्कन चार्जर्ससाठी खेळलेला दिग्गज उतरणार आयपीएल लिलावात, आंतरराष्ट्रीय पुनरागमनाची लागली आशा

On: मंगळवार, फेब्रुवारी 2, 2021 7:30 PM
---Advertisement---

आयपीएलचा चौदावा हंगाम एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. मात्र, त्याआधीच आयपीएलच्या बातम्यांनी क्रीडाक्षेत्र व्यापून टाकले आहे. १८ फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव पार पडल्यानंतर सर्व संघांची तयारी जोमाने सुरू होईल. तत्पूर्वी, लिलावाआधी वेस्ट इंडीजचा दिग्गज वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्डस याने १२ वर्षानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. एडवर्ड्स २०१२ साली आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाची आशा

सध्या अबुधाबी येथे सुरू असलेल्या अबुधाबी टी१० लीगमध्ये तो दिल्ली बुल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. एडवर्डने एका मुलाखतीत सांगितले, “कोलपॅक करार रद्द झाल्याने आता मी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास आतुर आहे. वेस्ट इंडीजचा टी२० कर्णधार कायरन पोलार्ड व प्रशिक्षक फिल सिमन्स यांच्याशी मी पुनरागमनाबाबत चर्चा केली. मागील १८ महिन्यांच्या काळात मी तंदुरुस्तीवर कठोर मेहनत घेतली आहे. सध्या मी पूर्वीपेक्षा अधिक तंदुरुस्त झालोय. सीपीएलमध्ये माझी कामगिरी समाधानकारक होती. आंतरराष्ट्रीय पुनरागमनाबाबत मी आशावादी आहे.”

मी आयपीएल खेळण्यास सज्ज

एकेकाळी वेस्ट इंडीजचा सर्वात वेगवान गोलंदाज असलेल्या एडवर्ड्सने पुढे म्हटले की, “कोलपॅक करारामुळे मी इंग्लिश क्लब हॅम्पशायरसाठी खेळत होतो. तेथील अनुभव चांगला होता. मात्र, त्यामुळे मी आयपीएलमध्ये खेळू शकलो नाही. आता मी हॅम्पशायरचा भाग नसल्याने आयपीएल खेळण्यास सज्ज आहे.” युरोपियन युनियनमधून युकेमध्ये केले जाणारे रजिस्ट्रेशन आता बंद करण्यात आले आहे. त्यामुळे काउंटी खेळाडूंना इतरत्र खेळण्यास परवानगी दिली गेली आहे.

डेक्कन चार्जर्सचा भाग होता एडवर्ड्स

सध्या ३९ वर्षाच्या असलेल्या एडवर्ड्सने यापूर्वी २००८ च्या आयपीएल हंगामात अखेरच्या वेळी सहभाग नोंदवला होता. त्यावेळी त्याने डेक्कन चार्जर्स संघाचे प्रतिनिधित्व केलेले. २०१३ च्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्स संघाने त्याला खरेदी केले. मात्र, दुखापतीमुळे तो स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता.

महत्वाच्या बातम्या:

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकल्यानंतर एम अश्विनने काढली स्वर्गीय आईची आठवण, लिहली भावनिक पोस्ट

ब्रेकिंग! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या कारणामुळे दक्षिण आफ्रिका दौरा केला स्थगित

भारतीय संघात निवड न झाल्यानंतर आली नटराजनची प्रतिक्रिया, म्हणाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---