---Advertisement---

दोन सामन्यात रोहित बाद होण्यामागे आहे विराटचा हात, वाचा सविस्तर

---Advertisement---

आयपीएल २०२१ हंगामातील ९ वा सामना शनिवारी (१७ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा या सामन्यात चांगल्या लयीत दिसत होता. मात्र, एक चुकीचा फटका मारून तो बाद झाला. परंतु, बाद होताच त्याच्या बाबतीत एक अनोखी घटना घडली.

दुसऱ्यांदा विराटचा बनला शिकार
प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर मुंबईसाठी यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक व कर्णधार रोहित शर्मा हे सलामीला उतरले. दोघांनी संघाला आक्रमक सुरुवात देत सहा षटकांच्या पावर प्लेमध्ये ५० धावा बनविल्या. रोहित हा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. मात्र, विजय शंकर टाकत असलेल्या सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रोहित षटकार मारण्याच्या नादात लॉंग ऑनला विराट सिंगच्या हाती झेल देऊन परतला. रोहितने २५ चेंडूत २ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३२ धावा बनविल्या.

बनला अजब योगायोग
रोहित आयपीएल २०२१ हंगामातील तिसरा सामना खेळत आहे. या तिन्ही सामन्यात तो बाद झाला. या तीन पैकी दोन सामन्यात त्याच्या बाद होण्यामध्ये विराट नावाच्या खेळाडूंचा सहभाग राहिला आहे. विराट पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध विराट कोहलीच्या थ्रोवर धावबाद झाला होता. तर, या सामन्यात त्याचा झेल विराट सिंगने घेतला. केकेआर विरुद्धच्या सामन्यात त्याला पॅट कमिन्सने त्रिफळाचीत केले होते.

मुंबईची सन्मानजनक धावसंख्या
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकात ५ गडी गमावून १५० अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. मुंबईसाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ४० धावा बनविल्या. तर, रोहित शर्माने ३२ व कायरन पोलार्डने नाबाद ३५ धावांचे योगदान दिले. हैदराबादसाठी विजय शंकर व मुजीब उर रहमानने प्रत्येकी दोन बळी मिळवले.

महत्त्वाच्या बातम्या –

तोडफोड फलंदाजी! बेअरस्टोने बोल्टच्या गोलंदाजीवर एवढा जोरदार सिक्स मारला की फ्रिजच्या काचांचा झाला भुगा

अबब! पोलार्डने मारला तब्बल १०५ मीटरचा षटकार, पाहा व्हिडिओ

‘सिक्सर किंग’ रोहित! आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पोहोचला ‘या’ स्थानी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---