21वा फिफा विश्वचषक 14 जूनपासून रशियात सुरू होत आहे. तर मागच्या वर्षीच स्पर्धेच्या तिकीट विक्रीला सुरूवात झाली.
काही देशांचा या स्पर्धेत सहभाग नसताना सुध्दा त्या देशांच्या चाहत्यांनी तिकीटे विकत घेतली आहेत. यामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे तर युएसए(युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका) पहिल्या क्रमांकवर आहे.
भारतीय चाहत्यांनी खरेदी केली 17,962 तिकीटे
भारतीय चाहत्यांनी 17,962 तर युएसएने 86,710 तिकीटे विकत घेतली आहेत. चीन 39,884 तिकींटासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
54 टक्के आतंरराष्ट्रीय चाहत्यांनी तिकीटे विकत घेतली आहेत. ज्या देशांनी आतापर्यंत तिकीटे विकत घेतली आहे त्यात भारत पहिल्या वीस मध्ये आहे.
फिफा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील तिकीट विक्रीला सप्टेंबर 2017 पासून सुरूवात झाली आहे त्यात भारत पहिल्या दहामध्ये होता. तर शेवटच्या टप्प्याला सुरूवात झाली तेव्हा पहिल्या 24 तासांमध्येच 18 भारतीयांनी 1905 तिकीटे खरेदी केली
भारतात क्रिकेटमध्ये आयपीएल(इंडियन प्रिमीयर लीग) तर फुटबॉलमध्ये आयएसएल (इंडियन सुपर लीग) अशा अनेक स्पर्धा होत आहेत.
यामुळे क्रिकेट बरोबरच फुटबॉल चाहत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच भारतीय फुटबॉलपटू आयएसएल आणि राष्ट्रीय संघात चांगली कामगिरी करत आहे.
भारतीय संघ या स्पर्धेस पात्र ठरला नाही. मात्र भारतीय चाहते त्यांच्या आवडत्या संघाना पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहेत.
तिकीटे विकत घेणाऱ्यामध्ये यजमान रशिया पहिल्या क्रमांकावर आहे. रशियाने आतापर्यंत 8,72,578 तिकीटे विकत घेतली असून ते सगळ्यात पुढे आहे.
पहिला सामना 14 जूनला रशिया विरूद्ध सौदी अरेबिया यांच्यात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
–रोनाल्डो-मेस्सी बरोबर माझी तुलना करणे अयोग्य- सुनिल छेत्री
–भारताचा स्टार फुटबाॅलपटू लिओनेल मेस्सीला पडतोय भारी!
–फुटबॉल फॉर्मेशन म्हणजे नक्की काय रे भाऊ?
–मेस्सीच्या कोलकात्यामधील चाहत्याने घरालाच दिला अर्जेंटीनाच्या जर्सीचा रंग
–इंटरकॉन्टिनेंटल कप 2018: सुनील छेत्रीच्या टीम इंडियाने केनियाचा पराभव करत जिंकले विजेतेपद