रशिया। आज फिफा विश्वचषकात अर्जेंटीना विरूद्ध आइसलॅंड सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. हा ड गटातील पहिलाच सामना होता.
अर्जेंटीनाचा संघाचा हा 17वा तर आइसलॅंडचा संघाचा हा पहिलाच विश्वचषक आहे.
अर्जेंटीनाकडून स्ट्रायकर कुन अगुएरोने 19व्या मिनीटाला तर आइसलॅंडकडून फॉरवर्ड अल्फ्रेड फिनबॉग्जनने 23व्या मिनीटाला गोल केला.
आइसलॅंडने त्यांच्या पहिल्याच विश्वचषकात बलाढ्य अर्जेंटीनाला रोखून धरले. अर्जेंटीनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला पेनल्टीवर गोल करण्याचीही संधी होती परंतू त्याने मारलेला चेंडू आइसलॅंडचा गोलकिपर हेंस थोर हाल्डडॉर्सनने आडवला.
यामुळे अर्जेंटीनाला बरोबरीत रोखण्यात आइसलॅंडला यश आले.
🎙 @aguerosergiokun: "Esto recién empieza, aún queda mucho por jugar".
— 🇦🇷 Selección Argentina ⭐⭐⭐ (@Argentina) June 16, 2018
13 – Since 1966, only Luigi Riva has attempted more shots in a World Cup game (13 vs both Sweden and Israel in 1970) without scoring than Lionel Messi did today against Iceland (since 1966). Shocker.#ARGISL #ARG #WorldCup pic.twitter.com/rhnROlfewx
— OptaJoe (@OptaJoe) June 16, 2018
याआधी अर्जेंटीनाने 1978 आणि 1986 असे दोन फिफा विश्वचषक जिंकले असून मागच्या विश्वचषकात म्हणजेच 2014चे ते उपविजेते आहेत.
मागील विश्वचषकातील अंतिम सामन्यात त्यांना जर्मनीकडून 1-0 असे पराभूत व्हावे लागले.
2016-17मध्ये झालेल्या विश्वचषक पात्रता फेरीत अर्जेंटीनाने इक्वाडोरला पराभूत केले. या सामन्यात लियोनल मेस्सीने हॅट्ट्रिक केल्याने त्यांचा 21व्या फिफा विश्वचषकात प्रवेश निश्चित झाला.
तसेच आइसलॅंडचा संघ 2016च्या युरोपियन चषकातील उपांत्यपूर्व सामन्यात पोहचला होता. या उपांत्यपूर्व सामन्यात त्यांना फ्रांसकडून 5-2 ने पराभूत व्हावे लागले.
अर्जेंटीना फक्त एकच सराव सामना खेळू शकला आहे. इस्राईल विरूद्धचा सराव सामना राजकीय कारणामुळे रद्द करण्यात आला होता.
आइसलॅंडचा गोलकिपर हेंस थोर हाल्डडॉर्सन हा आजच्या सामन्याचा सामनावीर ठरला.
तसेच फिफा क्रमवारीत अर्जेंटीना 5व्या तर आइसलॅंड 22व्या स्थानावर आहे.