रशिया। आज फिफामध्ये गट इ मधील पहिला सामना कोस्टा रिका विरूद्ध सर्बिया असा आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सांयकाळी 5.30 ला सुरू होणार आहे.
कोस्टा रिका पाचवा तर सर्बिया तेरावा विश्वचषक खेळत आहे.
कोस्टा रिकाचा 1990 चा पहिला विश्वचषक होता. तसेच त्यांनी 2014च्या ब्राझिलमध्ये झालेल्या विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली होती.
इंग्लंड, इटली आणि उरूग्वे या तगड्या संघांना पराभूत करून कोस्टा रिका उपांत्यपूर्व फेरीत पोहचला होता.
2016ला झालेल्या विश्वचषक पात्रता फेरीत त्यांनी अमेरिकेला फॉरवर्ड जोएल कॅंपबेलने केलेल्या गोलच्या जोरावर 4-0 ने पराभूत करून 2018च्या विश्वचषकातील प्रवेश निश्चित केला.
???? "Details will be the difference, and that will be our approach"@FSSrbije expect an equal opponent in #CRC, according to Nemanja Matic. #CRCSRB pic.twitter.com/atv62KyfV7
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) June 17, 2018
कॅंपबेलने 2014च्या विश्वचषकात खेळताना उरूग्वेविरूद्ध एक गोल केला. हा त्याच्या विश्वचषक कारकीर्दीतील पहिला गोल ठरला. हा सामना त्यांनी 3-1ने जिंकला.
कर्णधार अटॅकिंग मिडफिल्डर ब्रायन रूइझ हा कोस्टा रिकाचा महत्त्वाचा खेऴाडू आहे. स्ट्रायकर असलेल्या या खेळाडूने 2014च्या विश्वचषकात महत्त्वाची भुमिका पार पाडली होती. तसेच रूइझने विश्वचषकाच्या पात्रता फेरीत 3 गोलही केले आहेत.
सर्बियाचा हा 13वा विश्वचषक असून 1930 मध्ये त्यांनी पहिला विश्वचषक खेळला आहे. तर 2010 हा शेवटचा विश्वचषक होता .
1930 आणि 1962 मध्ये असे ते दोनदा उपांत्य सामन्यात खेळले आहेत. 2017ला झालेल्या विश्वचषकाच्या पात्रता फेरीत त्यांनी आयर्लंडला 1-0 असे पराभूत केले.
कर्णधार अलेक्झांडर कोल्हारोव्ह याने हा गोल केला होता. कोल्हारोव्हचा हा दुसरा विश्वचषक आहे.
ब्रेनसिला इवानोविक हा सर्बियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. चेलसा कडून खेळताना त्याने युरो चॅम्पियन लीग आणि तीन इंग्लिश प्रिमीयर लीगचे विजेतेपद जिंकले आहेत.
फिफा क्रमवारीत कोस्टा रिका 23व्या आणि सर्बिया 34व्या स्थानावर आहे.








