---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका राहुलसाठी ठरणार ‘डू ऑर डाय’! तीन सामन्यांवर कारकीर्द अवलंबून

On: गुरूवार, मार्च 16, 2023 9:00 PM
KL-Rahul
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका शुक्रवारी (17 मार्च) सुरू होत आहे. वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाचा नियमित कर्णदार रोहित शर्मा याने पहिल्या सामन्यातून माघार घेतली. रोहितच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार आहे. या मालिकेत सर्वांचे लक्ष भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुल याच्याकडे असेल. मागील बऱ्याच काळापासून खराब फॉर्म मध्ये असलेल्या राहुलकडे ही संघातील जागा वाचवण्याची अखेरची संधी असल्याचे म्हटले जात आहे.

केएल राहुल अगदी काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा उपकर्णधार होता. मात्र, खराब फॉर्ममुळे त्याच्याकडून हे पद गेले. त्यासोबतच कसोटी संघातील जागा देखील त्याला गमवावी लागली.‌ वनडे संघातील जागा वाचवण्याची तसेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी त्याच्याकडे ही शेवटची संधी असणार आहे.

राहुल या वनडे मालिकेत पाचव्या क्रमांकावरच फलंदाजी करताना दिसण्याची शक्यता आहे. पाचव्या क्रमांकावर त्याची कामगिरी देखील उल्लेखनीय झाल्याचे दिसते. श्रीलंकेविरुद्धच्या मागील मालिकेत देखील त्याने भारतीय संघासाठी संकटमोचक बनून शानदार खेळ दाखवलेला. पाचव्या क्रमांकावरील त्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते की, त्याने 16 डावात 50 च्या सरासरीने 658 धावा केल्या आहेत. यामध्ये सहा अर्धशतके व एका शतकाचा समावेश आहे.

राहुल या मालिकेत यष्टीरक्षण करतो का हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरेल.‌ कारण, रिषभ पंत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळणार नसल्याने तसेच केएस भरत तितका प्रभावी न ठरल्याने राहुल याला संघात स्थान मिळण्याची आशा असेल. वनडे मालिकेत ईशान किशन यष्टीरक्षण करताना दिसू शकतो.

(Final Chance For KL Rahul ODI Series  Against Australia)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विन-जडेजा की अक्षर? WTC फायनलमध्ये कोणाला मिळणार जागा? वरिष्ठ खेळाडूने दिले उत्तर
शोएब अख्तरचे ‘हे’ विधान चर्चेत, जाणून घ्या आधार कार्डविषयी काय म्हणाला पाकिस्तानी दिग्गज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---