भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली वन डे वर्ल्ड कप नंतर क्रिकेटपासून दूर आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याची संघात निवड झाली होती, परंतु वैयक्तिक कारणामुळे त्याने माघार घेतली. दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी त्याने ही सुट्टी घेतली होती. पण, आता तो आगामी इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये खेळणार की नाही, याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
याबरोबरच, आयपीएलचा 17 वा हंगाम दहा दिवसांवर आला असून चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 22 मार्चला पहिला सामना होणार आहे. तसेच आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. तर तो 16 मार्चच्या आधीच बंगळुरू येथे दाखल होईल. तसेच 2008 पासून तो RCB कडून खेळतोय आणि आयपीएल इतिहासात एकाच फ्रँचायझीकडून 16 वर्ष खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे. विराटने मागील हंगामातील 14 सामन्यांत 2 शतकं व सहा अर्धशतकांसह 639 धावा केल्या होत्या.
आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीनं आतापर्यंत 237 सामने खेळले असून त्यात कोहलीनं 229 डावांमध्ये 7263 धावा केल्या आहेत. या कालावधीत विराट कोहलीनं 7 शतकं आणि 50 अर्धशतकं ठोकली. 2016 चा आयपीएल सीझन विराट कोहलीसाठी खूप खास होता. या मोसमात विराटच्या बॅटमधून तब्बल 973 धावा निघाल्या. हा आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.
Then, now and forever. 🥹✨#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL #ViratKohli @imVkohli pic.twitter.com/TT5xgs3rcJ
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 11, 2024
विराट कोहलीनं अनेक वर्षे आरसीबीचं कर्णधारपद भूषवलं, परंतु तो आपल्या संघासाठी एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवू शकला नाही. विराटनं 2022 मध्ये आरसीबीचं कर्णधारपद सोडलं. तेव्हापासून दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू फाफ डू प्लेसिस आरसीबीचं नेतृत्व करत आहे.
दरम्यान,अशातच संघाचे निवडकर्ते विराटला टी-20 विश्वचषकासाठीच्या संघात घेणे टाळू शकतात. अनुभवी खेळाडू टी-20 फॉरमॅटमध्ये संघाच्या गरजेनुसार प्रदर्शन करत नाही, असे बोलले जात आहे. त्याने टी-20 विश्वचषक 2022 मध्ये सातत्याने स्वतःला टी-20 क्रिकेटपासून दूर ठेवले आहे. दरम्यानच्या काळात अफगाणिस्तानविरुद्ध केवळ दोन टी-20 सामने त्याने खेळले आहेत. तर माहितीनुसार विराटला विश्वचषकासाठी निवडायचे की नाही, ही जबाबदारी बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक अजिक आगरकर यांच्यावर सोपवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामात ‘या’ दिवशी होणार GT आणि MIचा सामना, पाहा आकडेवारी
- के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये ‘ब’ गटातील सामान्यांची सुरुवात