---Advertisement---

हैदराबाद विमानतळावर झाली सिराज अन् अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची भेट; म्हणाल्या, ‘तुम्ही जिद्दीने आणि…’

On: मंगळवार, नोव्हेंबर 21, 2023 5:21 PM
Mohammed-Siraj
---Advertisement---

भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभूत झाला. यावेळी भारताचे 12 वर्षांनंतर तिसरा वनडे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. अशात भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी विश्वचषक संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. 20 नोव्हेंबर) भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याची भेट घेतली. तसेच, संघाच्या विश्वचषकातील शानदार प्रदर्शनासाठी त्याचे अभिनंदनही केले. भारतीय संघाने अंतिम सामन्यात पोहोचण्यापूर्वी खेळलेले 10 सामने जिंकले होते, पण 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाचा धक्का दिला.

सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांच्या कार्यालयाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला. या फोटोत मोहम्मद सिराज आणि निर्मला सीतारामण (Mohammed Siraj And Niramala Sitharaman) दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “निर्मला सीतारामण यांनी हैदराबादमध्ये राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोहम्मद सिराजशी भेट घेतली. तसेच, क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील संघाच्या शानदार प्रदर्शनासाठी त्याचे अभिनंदन केले. यासोबतच अर्थमंत्र्यांनी नमूद केले की, संपूर्ण संघ स्पर्धेत जिद्दीने आणि धैर्याने खेळला. त्यामुळे संपूर्ण देशाला खूप अभिमान आणि आनंद झाला. तसेच त्यांनी मोहम्मद सिराजचे मनोबल वाढवत त्याला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.”

सिराजचे स्पर्धेतील प्रदर्शन
मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हा विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत भारतीय संघाकडून शानदार प्रदर्शन करणाऱ्या गोलंदाजांपैकी एक ठरला. त्याने पदार्पणाच्या विश्वचषकात 11 सामने खेळताना 33.50च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या. यादरम्यान 16 धावा खर्चून 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी राहिली. सिराजने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यासोबत मिळून संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी सिराजला विश्रांती
विश्वचषक 2023 संपल्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. या मालिकेला 23 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. सोमवारी बीसीसीआयने या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. यात विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांच्यासह इतर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. (finance minister nirmala sitharaman meets indian pacer mohammed siraj after india s world cup final 2023 loss)

हेही वाचा-
CWC 2023 । वॉर्नर अजून संपला नाही, निवृत्तीचा अंदाज वर्तवल्यानंतर दिग्गजाने एकदाचे स्पष्टचं करून टाकले
IPLमध्ये षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या धोनीच्या हुकमी एक्क्याची टीम इंडियात निवड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार का कमाल?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---