---Advertisement---

लाॅर्ड्स कसोटी पाकिस्तानने जिंकली, इंग्लंडविरुद्ध मालिकेत १-० आघाडी

On: रविवार, मे 27, 2018 5:08 PM
---Advertisement---

लाॅर्ड्स | इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिकेत पाकिस्तानने ९ विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यांना दुसऱ्या डावात जिंकायला ६४ धावांची गरज होती.

पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात हॅरीस सोहेलने नाबाद ३९, इमाम उल हकने नाबाद १८ तर अझहर अलीने ४ धावा केल्या.

तत्पुर्वी आज इंग्लंडचा दुसरा डाव पाकिस्तानने २४२ धावांत संपुष्टात आणला. इंग्लडकडून दुसऱ्या डावात कर्णधार जो रुटने ६८ तर जाॅश बटलरने ६७ आणि डाॅमीनिक बेसने ५७ धावा केल्या. 

पाकिस्तानकडून इंग्लडच्या दुसऱ्या डावात मोहम्मद आमीरने ४, मोहम्मद अब्बासने ४ आणि शदाब खानने २ विकेट्स घेतल्या.

गेल्या दहा वर्षात पाकिस्तानने ११ पैकी ५ कसोटी सामन्यात इंग्लंडमध्ये विजय संपादित केला आहे. लाॅर्ड्सवर पाकिस्तानने ५ विजय मिळवले असुन ४ पराभव पाहिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल विजेते होणार मालामाल, मिळणार मोठे बक्षीस

त्या शाॅटवर षटकार नाही तर अष्टकारचं द्या!

आयपीएलमधील आजपर्यंतचा सर्वात खास विक्रम रैना आज करणार!

-तर धोनी करणार ४८ तासांत तो विक्रम आपल्या नावावर!

एबी डिव्हिलियर्सच्या नावाने कुणी दिली शेगांव संस्थानला देणगी?

२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल!

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment