श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात गॉल स्टेडियमवर दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याची रंगतदार लढत चालू आहे. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड संघ ९ बाद ३३९ धावांवर असून त्यांना अजून श्रीलंकाचे ४२ धावांचे आव्हान पूर्ण करायचे आहे. इंग्लंडच्या या डावादरम्यान श्रीलंकाचा फिरकीपटू लसिथ एम्बलडेनिया याने सर्वाधिक विकेट्स काढल्या आहेत. यासाठी संघ सहकारी लहिरू थिरिमाने याने साहाय्य केले असून अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.
झाले असे की, श्रीलंका संघाच्या पहिल्या डावातील ३८२ धावांच्या डोंगर इंग्लंडला पार करायचा होता. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्राउले सहाव्या षटकातच एम्बलडेनियाच्या गोलंदाजीवर थिरिमानेच्या हाती झेल देऊन बसला. त्यानंतर डॅनियल लॉरेन्सदेखील अशाचप्रकारे झेलबाद झाला. एवढेच नव्हे तर, पुढे एम्बलडेनियाच्या गोलंदाजीवर थिरिमानेने सॅम करन, डोमिनिक बेस आणि मार्क वूड यांनाही झेलबाद केले.
अशाप्रकारे थिरिमानेने एका डावात फिरकीपटू एम्बलडेनियाचे तब्बल ५ झेल पकडले. यासह थिरिमाने हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात एकाच गोलंदाजाच्या गोलंदाजांच्या गोलंदाजीवर ५ फलंदाजांचे झेल पकडणारा पहिलाच क्षेत्ररक्षक ठरला आहे.
This is the first time in Test history that a fielder has taken as many as 5 catches off the same bowler in the same innings
— Benedict Bermange (@Benedict_B) January 24, 2021
लसिथ एम्बलडेनियाने घेतल्या सर्वाधिक विकेट्स
थिरिमानेच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे एम्बलडेनियाला इंग्लंडच्या पहिल्या डावात तब्बल ७ विकेट्स मिळाल्या आहेत. थिरिमानेच्या ५ झेलव्यतिरिक्त एम्बलडेनियाने इंग्लंडचा सलामीवीर डोमिनिक सिब्ले याला पायचित केले. तर जॉनी बेयरस्टोला संघ सहकारी ओशादाच्या हातून झेलबाद करत एकूण ७ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
जो रूटने केली दीडशतकी खेळी
इंग्लंडकडून फलंदाजी करताना कर्णधार जो रूट याने सर्वाधिक १८६ धावांची झुंजार दीडशतकी खेळी केली. या खेळीसाठी त्याने १८६ चेंडू खेळले आणि दरम्यान १८ चौकार मारले. रूट बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर याने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. परंतू बटलरची विकेट पडल्यानंतर इतर खेळाडू खास कामगिरी करू शकले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
“आता भारतासाठी सलामीला फलंदाजी करण्यासही तयार”, वॉशिंग्टन सुंदरने केले प्रतिपादन
“मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी दहा वेळा बघितली होती सचिनची ‘ती’ खेळी, अजिंक्य रहाणेने केला उलगडा
“इंग्लंडने आपला सर्वोत्तम ताकदीचा संघ न उतरवणे, हा भारताचा अपमान असेल”





