---Advertisement---

“मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी दहा वेळा बघितली होती सचिनची ‘ती’ खेळी, अजिंक्य रहाणेने केला उलगडा

On: रविवार, जानेवारी 24, 2021 11:06 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघासाठी पुढील वाटचाल अवघड मानली जात होती. नियमित कर्णधार विराट कोहलीची पालकत्व रजा व जवळजवळ दहा प्रमुख खेळाडूंची दुखापत भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरत होती. मात्र या सर्व परिस्थितीतही कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्व क्षमतेची चुणूक दाखवत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

रहाणेने मालिकेत आपल्या नेतृत्वासोबतच फलंदाजीने देखील सर्व क्रिकेट रसिकांची मने जिंकली. मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्यने शानदार शतक झळकावले होते. त्याने या खेळी बद्दल नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. रहाणेने यावेळी स्पष्ट केले की सामन्यापूर्वी त्याने जवळजवळ दहा वेळा सचिन तेंडुलकरची खेळी बघितली होती.

एका मुलाखतीदरम्यान रहाणे म्हणाला, “मी सचिनची खेळी बघितली, ज्यात सचिनने कर्णधार असताना मेलबर्न येथे शतक ठोकले होते. सचिनने इनिंगमध्ये 116 धावा केल्या होत्या. मी फलंदाजी करण्याच्या आदल्या दिवशी दहा वेळा व दुसऱ्या दिवशी सकाळीही सहा ते सात वेळा ती खेळी बघितली होती. सचिन व द्रविड माझे आदर्श आहेत.” रहाणेने उल्लेख केलेली खेळी सचिनने मेलबर्न येथे 1999 साली खेळलेली होती.

रहाणेने मेलबर्न येथे भारताच्या पहिल्या डावात शानदार शतकी खेळी केली होती. त्याने 223 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 112 धावा केल्या होत्या. रहाणेच्या या कर्णधारपदाला साजेशा खेळीमुळेच भारतीय संघाने मेलबर्न कसोटी सामना जिंकला व मालिकेत जोरदार पुनरागमन केले.

महत्वाच्या बातम्या:

SL vs ENG : रूटच्या झुंजार शतकाने इंग्लंडला तारले, दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत

राहुल द्रविड यांनी पुन्हा एकदा सिद्ध केला मनाचा मोठेपणा; युवा खेळाडूंच्या यशाचे श्रेय नाकारत म्हणाले

मुलीच्या जन्मापेक्षा जास्त आनंद देशाकडून खेळण्यात होता, टी नटराजनचं मन जिंकणार वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---