ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS vs ENG)यांच्यात सध्या प्रतिष्ठित अशी ऍशेस मालिका (Ashes Series) खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच संपला असून यजमान ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सने या सामन्यात बाजी मारली आहे. यासह त्यांनी मालिकेतही १-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान या मालिकेच्या पाचव्या व अंतिम सामन्याचे ठिकाण निश्चित झाले असून हा सामना जानेवारीत हॉबर्ट येथे खेळला जाईल. हा सामना दिवस-रात्र स्वरुपात होईल. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात आणि ऍशेस मालिकेत पहिल्यांदाच एक विशेष अशी गोष्ट घडणार आहे.
ऍशेस मालिकेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकाची घोषणा करतेवेळी, सुरुवातीच्या ४ सामन्यांच्या तारिख, वेळ आणि ठिकाणांचीही घोषणा करण्यात आली होती. परंतु पाचव्या सामन्याचे ठिकाण निश्चित नव्हते. अखेर १४ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या सामन्याच्या आयोजनाची जबाबदारी हॉबर्टमधील बेलेरिव्ह ओव्हल स्टेडियमवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे हॉबर्ट पहिल्यांदाच ऍशेस कसोटीचे यजमानपद सांभाळताना दिसेल.
तसेच २०१६ नंतर हॉबर्टमध्ये हा पहिलाच कसोटी सामना असेल. या मैदानावर झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकाने ऑस्ट्रेलियाने १ डाव आणि ८० धावांनी हरवले होते.
पूर्वी, हा सामना पर्थ येथे खेळवण्याची शक्यता होती. परंतु पश्चिम ऑस्ट्रेलियामधील कोविड-१९ शी संबंधित विलगीकरण आणि प्रांतीय सीमांवरील निर्बंधांमुळे हा सामना दुसरीकडे खेळवण्याचा निर्णय घेतला गेला होता.
अशाप्रकारे गुलाबी चेंडूने (Pink Ball Test) खेळवला जाणारा हा सामना ऍशेस मालिकेतील दुसरा दिवस-रात्र सामना असेल. हॉबर्ट कसोटी(Hobert Test) प्रमाणेच ऍडलेड (Adelaide Test) येथील दुसरा कसोटी सामनाही दिवस-रात्र (Day-Night Test) स्वरुपात होणार आहे. १६ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान हा सामना होईल. यासह क्रिकेट इतिहासात आणि ऍशेस मालिकेत पहिल्यांदाच (First Time In Ashes) कोणत्या कसोटी मालिकेत २ दिवस-रात्र सामने होतील.
पाचव्या आणि दुसऱ्या कसोटीखेरीज, उर्वरित तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे मेलबर्न आणि सिडनी येथे होणार आहे. यातील मेलबर्नमधील तिसरा सामना २६ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार असून, हा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना असेल. तर सिडनीच्या मैदानावरील चौथा सामना जानेवारीच्या सुरुवातीला (०५ ते ०९ जानेवारी) होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल ३३ वर्षांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणालाच जमला नाही, तो पराक्रम केवळ टीम इंडियाने करुन दाखवलाय
मलानची विकेट घेताच लायनची ३ मोठ्या विक्रमांना गवसणी; अश्विन, मुरलीधरनच्या पंक्तीत स्थान
पहिल्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंड चारीमुंड्या चीत! यजमानांचा ९ विकेट्सने दणदणीत विजय