पुणे| झेन्सर, टीसीएस संघाने प्रथम व्हिन्टेज आय-टी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
नेहरू स्टेडियमवर झालेल्या पहिल्या लढतीत झेन्सर संघाने परसिस्टंट संघावर ५ गडी राखून मात केली. परसिस्टंट संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६४ धावा केल्या. यात विशाल पवारने ३६ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ६८ धावा केल्या. झेन्सरकडून अनिल त्रिपाठीने चार गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल झेन्सरने १९.१ षटकांत ५ बाद १६५ धावा करून सहज विजय साकार केला. यात सलामीवीर भरत झव्हेरीने ३७ चेंडूंत ९ चौकारांसह ५५ धावा, तर प्रणव कुथेने ३१ चेंडूंत ३४ धावा करून त्याला चांगली साथ दिली. अकिब पीरझादेने १८ चेंडूंत नाबाद २८ धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुस-या लढतीत टीसीएस संघाने पीटीसी संघावर सात गडी राखून मात केली. पीटीसी संघाने दिलेले १३५ धावांचे लक्ष्य टीसीएस संघाने ३ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. संदीप देसाईच्या अर्धशतकाच्या जोरावर पीटीसी संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १३४ धावा केल्या. संदीपने ३५ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावा केल्या.
टीसीएस संघाने विजयी लक्ष्य १७.५ षटकांत ३ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. टीसीएसकडून गौरव भालेरावने ३७ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ५८ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक –
१) परसिस्टंट – २० षटकांत ७ बाद १६४ (विशाल पवार ६८, सुधीर परांजपे १८, अनिल त्रिपाठी ४-२१, अकिब पीरझादे १-२१, मुझमिल खान १-२४) पराभूत वि. झेन्सर – १९.१ षटकांत ५ बाद १६५ (भरत झव्हेरी ५५, प्रणव कुथे ३४, अकिब पीरझादे नाबाद २८, सुशांत बन्सल २-१८, अनुराग हंबीर १-१७).
२) पीटीसी – २० षटकांत ६ बाद १३४ (संदीप देसाई ५६, कौस्तुभ शिंदे २२, अभिनव कालिया २-१२, अभिजित यादव १-२५, तेजपालसिंग १-१७) पराभूत वि. टीसीएस – १७.५ षटकांत ३ बाद १३८ (गौरव भालेराव नाबाद ५८, निकुंज अगरवाल ३२, विक्रमजितसिंग २१, भास्कर छीडे १-२२, अजित नाईक १-२३).