पुणे । नेहरू स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत विप्रोविरुद्ध सीबीएसएल संघाला प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ११० धावाच करता आल्या. यात अतिफने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. विप्रोकडून विशाल हिरगुडेने तीन गडी बाद केले. यानंतर सीबीएसएलच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून विप्रोचा डाव १६.५ षटकांत ८६ धावांतच गुंडाळला.
विप्रोकडून कृणाल सोलंकीने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. सीबीएसएलकडून महेंदरने ३ गडी बाद केले.
दुस-या लढतीत टेक महिंद्रा संघाने सिनरझिप संघावर २७ धावांनी मात केली. टेक महिंद्रा संघाने प्रथम फलंदाजी करताना २ बाद १६३ धावा केल्या. यात अमितोष निखारने ५३ चेंडूंत ८ चौकारांसह नाबाद ७४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सिनरझिप संघाला १३६ धावाच करता आल्या.
स्पर्धेचे उद्घाटन इंडियन बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक सौरभकुमार सिंग, प्रथम स्पोर्ट्सचे चेअरमन अमित जगताप, संचालक भाऊसाहेब डांगे, सुजय निकम
यांच्या उपस्थितीत झाले.
संक्षिप्त धावफलक – १) सीबीएसएल – २० षटकांत ७ बाद ११० (अतिफ ३१, प्रसाद जैस्वाल २४, विशाल हिरगुडे ३-२०, सुशांत सिन्हा १-२०) वि. वि. विप्रो – १६.५ षटकांत सर्वबाद ८६ (कृणाल सोलंकी ४३, सनी भारद्वाज १६, महेंदर ३-२४, केतन घाडगे २-२२, आकाश अहीर २-५).
२) टेक महिंद्रा – २० षटकांत २ बाद १६३ (अमितोष निखार नाबाद ७४, रजत भट्टलवार ३७, प्रतीक दुबे नाबाद ३४, शैलेश तुरिया १-२७, राहुल पंडिता १-२५) वि. वि. सिनेरझिप – २० षटकांत सर्वबाद १३६ (आशिष गोखले ३५, संदीप कांबळे २०, मनीष चौधरी ४-२७, सचिन कुलकर्णी २-३०).