आयपीएलच्या १३ व्या हंगामाला कालपासून (१९ सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. या हंगामातील पहिला सामना मागील वर्षीचा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि उपविजेता चेन्नई सुपर किंग्ज संघात आबु धाबी येथे खेळला गेला आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. तो टी२० क्रिकेटच्या इतिहासात यष्टीमागे २५० विकेट्स घेणारा पहिलाच यष्टीरक्षक ठरला आहे. First Wicketkeeper Who Take 250 Wickets In T20 Cricket History
या सामन्यात चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई संघ सुरुवातीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने दमदार सुरुवात केली होती. पण पुढे ६ षटकांच्या आतच दोघेही बाद झाले. त्यांच्यापाठोपाठ सूर्याकुमार यादवही फक्त १७ धावा करत पव्हेलियनला परतला.
त्यानंतर सामन्यातील १५वे षटक टाकण्यासाठी आलेल्या अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने २ विकेट्स चटकावल्या. त्याने सौरभ तिवारीला ४२ धावांवर तर हार्दिक पंड्याला १४ धावावंर फाफ डू प्लेसिसच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे मुंबईचे धुरंदर खेळाडू क्रुणाल पंड्या आणि कायरन पोलार्ड फलंदाजीसाठी मैदानावर उतरले.
त्यावेळी सामन्यातील १७वे षटक टाकण्यासाठी कर्णधार धोनीने डेथ ओव्हर स्पेशलिस्ट लुन्गी एन्डिगीला पाठवले. एन्डिगीने १७व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर क्रुणालला झेलबाद केले. यष्टीमागे उभा असलेल्या धोनीने क्रुणालचा झेल पकडला. तर एन्डिगीच्या पुढील षटकातील पहिल्या चेंडूवर परत धोनीने यष्टीमागे झेल पकडत पोलार्डला तंबूचा रस्ता दाखवला. तो फक्त १८ धावांवर बाद झाला.
यासह धोनीने पहिल्या आयपीएल सामन्यात यष्टीमागे २ विकेट्स घेत, टी२० क्रिकेटमधील आपल्या यष्टीमागील २५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यासह धोनीने टी२० क्रिकेटच्या इतिहासात यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेण्याचा शानदार विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात मुंबईने चेन्नईसमोर १६३ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान चेन्नईने १९.२ षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले आणि सामन्यात विजय मिळवला.
टी२० क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारे यष्टीरक्षक-
२५० – एमएस धोनी
२३८ – कमरान अकमल
२१४ – दिनेक कार्तिक
२०५ – कुमार संगकारा
१८९ – दिनेश रामदिन
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईच्या ‘या’ धुरंदरने बाउंड्रीवर एक नव्हे तर झेलले २ अप्रतिम झेल, पहा व्हिडिओ
भल्या भल्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवणाऱ्या गोलंदाजाने केलाय नकोसा विक्रम, ठरलाय एकमेव गोलंदाज
नाणेफेक जिंकून सीएसकेची फिल्डिंग; या अष्टपैलू खेळाडूला नाही मिळाली जागा
ट्रेंडिंग लेख –
सौरभ तिवारी आणि मुंबई इंडियन्स ‘ये रिश्ता कुछ तो कहलाता है’
‘तो’ संघ जो आयपीएलची सुरुवात होण्याआधीच बनतो अंतिम सामन्याचा दावेदार!
८ आयपीएल संघांमध्ये एक एक तरी कमतरता आहेच, पहा कुणाकडे काय नाही