रविवारी (२३ जानेवारी) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह दक्षिण आफ्रिका संघाने ही मालिका ३-० ने आपल्या नावावर केली आहे. तर कसोटी मालिकेत देखील दक्षिण आफ्रिका संघाने २-१ ने विजय मिळवला होता. भारतीय संघाने ही मालिका गमावली असली तरीदेखील दरम्यान भारतीय संघासाठी काही सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत, ज्या भविष्यात भारतीय संघाच्या उपयोगी पडतील.
१) शार्दुल ठाकूर-दीपक चाहरची कामगिरी (Shardul thakur – Deepak chahar)
भारतीय संघासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर यांनी स्वतःला अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्ध केले आहे. या दोन्ही फलंदाजांनी गेल्या दोन्ही सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावले आहे. यासह गोलंदाजी करताना देखील अप्रतिम कामगिरी केली आहे. हे दोन्ही खेळाडू भविष्यात वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची कमतरता भरून काढू शकतात.
व्हिडिओ पाहा- आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener
२) शिखर धवनचा फॉर्म (Shikhar Dhawan) :
शिखर धवनचा फॉर्म हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय होता. गेल्या काही महिन्यांपासून तो संघाबाहेर होता. परिणामी त्याला आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते. तसेच गेल्या ४ वर्षांपासून तो संघाबाहेर आहे. या मालिकेसाठी संधी मिळताच त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे. त्याने या मालिकेतील ३ सामन्यात २ अर्धशतक झळकावले आहेत. त्याने १६९ धावा केल्या आहेत.
३) जसप्रीत बुमराहची गोलंदाजी (Jasprit bumrah) :
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कसोटी आणि वनडे मालिकेत अप्रतिम कामगिरी केली आहे. वनडे मालिकेत त्याने खूप कमी धावा खर्च केल्या. त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, त्याला या संघातील मुख्य गोलंदाज का म्हटले जाते? परंतु त्याला इतर गोलंदाजांची साथ मिळाली नाही. परिणामी भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला.
४) सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) :
भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादवला तिसऱ्या वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने ३९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्याला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तो मध्यक्रमात महत्वाची भूमिका पार पाडू शकला असता.
५) विराट कोहली (Virat Kohli) :
वनडे मालिकेत विराट कोहलीने एकही शतक झळकावले नाही. परंतु ३ पैकी २ सामन्यात त्याने अर्धशतक झळकावून आपण खराब फॉर्ममध्ये नसल्याचे स्पष्ट केले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्याचे वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. यानंतर वाद देखील झाले होते. परंतु विराट कोहलीने या वाद विवादाचा कुठलाही परिणाम आपल्या फॉर्मवर होऊ दिला नाही.
महत्वाच्या बातम्या:
आख्खी टीम राष्ट्रगीतात मग्न असताना विराटचं सुरू होतं भलतंच काही, पाहून प्रचंड संतापले चाहते
पप्पा विराटची झेरॉक्स कॉपी आहे ‘वामिका’, तिसऱ्या वनडेदरम्यान दिसली पहिली झलक; तुम्हीही बघा
हे नक्की पाहा: