कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यास सज्ज झाला आहे. युवा खेळाडूंनी भरलेली विराट सेना, न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या मोठ्या सामन्यासाठी सराव करण्यात व्यस्त आहे. हा सामना १८ जून ते २२ जून दरम्यान, साउथॅम्प्टनच्या रोज बाउल स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये कोणते खेळाडू असतील याबाबत कुठलीही माहिती दिली गेली नाहीये. परंतु या १५ सदस्यीय संघातील ५ खेळाडू असे आहेत, जे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याद्वारे साउथॅम्पटनमध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना खेळण्याचा अनुभव घेतील.
भारतीय संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय खेळाडूंची निवड केली आहे. या १५ खेळाडूंमध्ये ५ खेळाडू असे आहेत. ज्यांनी साउथॅम्प्टनच्या रोज बाउल स्टेडियममध्ये एकही सामना खेळला नाहीये. मुख्य बाब म्हणजे या ५ खेळाडूंपैकी ३ खेळाडू असे आहेत, ज्यांनी इंग्लंडमध्ये एकही कसोटी सामना खेळला नाहीये. याचा अर्थ हाच आहे की, १५ पैकी १२ खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. पण यापैकी केवळ १० खेळाडूंनी साउथॅम्प्टनमध्ये कसोटी सामना खेळला आहे. ( 5 indian players never played test cricket in Southampton)
हे आहेत साउथॅम्प्टनमध्ये कसोटी सामना खेळलेले भारतीय क्रिकेटपटू
साउथॅम्प्टनमध्ये कसोटी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे.
तसेच ५ असे खेळाडू आहेत ज्यांनी साउथॅम्प्टनमध्ये एकही कसोटी सामना खेळला नाहीये. यामध्ये वृद्धीमान सहा, मोहम्मद सिराज, शुबमन गिल, हनुमा विहारी आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. यापैकी उमेश यादव आणि हनुमा विहारी यांनी इंग्लंडमध्ये इतर ठिकाणी सामने खेळले आहेत. परंतु त्यांनी साउथॅम्प्टनमध्ये एकही कसोटी सामना खेळला नाहीये. तसेच सहा, गिल आणि सिराज हे पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळू शकतात.
अंतिम सामन्यासाठी जाहीर केलेल्या १५ खेळाडूंच्या संघात वृद्धीमान सहा, मोहम्मद सिराज, हनुमा विहारी, उमेश यादव आणि गिल हे खेळाडू आहेत. ज्यांना साउथॅम्प्टनमध्ये पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळू शकते.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघ- रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान सहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
रोनाल्डोच्या एका व्हिडिओमुळे हंगामा, कोका-कोला कंपनीला २९३ कोटींचे नुकसान
टी२० विश्वचषकापुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, ‘या’ महत्त्वाच्या दौऱ्यातून ७ खेळाडूंची माघार
‘पदार्पणाच्या कसोटीत धमाल करणार,’ धावांचा रतीब घालणाऱ्या सचिनला १७ वर्षीय खेळाडूची भुरळ