आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूंना बोर्डाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. हे नियम मोडणाऱ्या खेळाडूंवर योग्य ती कारवाई केली जाते. परंतु असे होऊ नये म्हणून, बोर्ड नेहमीच खेळाडूंसोबत चांगले संबंध ठेवण्याच्या प्रयत्नात असते. मात्र अनेकदा खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड यांच्यात काही कारणास्तव वाद होतो. ज्यामुळे बोर्ड देखील कारवाई करण्यात कुठलीही कसर सोडत नाही. असे काही खेळाडू आहेत, ज्यांना अशा प्रसंगाचा सामना करावा लागला आहे.
जेव्हा बोर्डाने आपल्या खेळाडूंवर केली टीका
काही दिवसांपूर्वी झिम्बाब्वे संघाचा फलंदाज रेयान बर्ल याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर फाटलेल्या बुटांचे फोटोज् शेअर केले होते. यासोबतच त्याने स्पॉन्सरशिपची देखील मागणी केली होती. त्यानंतर पुमा कंपनीने या ट्विटला प्रतिसाद देत मदत करण्याचे आव्हान केले होते. परंतु आता त्याच्यावर कारवाई केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे म्हणणे आहे की, रेयान बर्लच्या या कृत्यामुळे बोर्डाचे नाव खराब झाले आहे.
जेव्हा मोहिंदर अमरनाथ निवडकर्त्यांना म्हणाले होते, ‘जोकरांचा गट’
भारतीय संघाचे माजी भारतीय फलंदाज मोहम्मद अमरनाथ यांनी १९८३ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांनतर त्यांचे संघात आत-बाहेर होणे सुरू झाले होते. तसेच १९८९ मध्ये जेव्हा त्यांना संघाबाहेर करण्यात आले होते, तेव्हा त्यांनी निवडकर्त्यांना चक्क जोकरांचा गट असे म्हटले होते. यानंतर त्यांच्यावर टीका देखील केली गेली होती.
जेव्हा त्यांना याबद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा त्यांनी म्हटले होते की, “मी जे काही बोललो आहे. ते अगदी खरे होते. खरे बोलल्याने लोके दुखावतात. मला अजिबात त्रास झाला नाही. मला वाटले की त्यावेळी त्या गोष्टी चुकीच्या होत्या आणि मी फक्त माझे मन मोकळे केले आहे. मला अनेकदा दुर्लक्षित केले जात होते. त्यावेळी मी काहीच बोललो नाही. पण शेवटी ते बाहेर आलेच.”
जेव्हा ब्रावो आणि वेस्ट इंडिज बोर्डामध्ये झाला होता वाद
वेस्ट इंडिज बोर्ड आणि वेस्ट इंडिज संघातील खेळाडू यांच्यात वाद झाल्याचे आपण अनेक किस्से ऐकले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ड्वेन ब्रावोचा वाद. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे खेळाडूंशी वाद घालण्याचे सर्वात मोठे कारण तेथील केंद्रीय करार आहे. २०१४ मध्ये जेव्हा भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता. तेव्हा ब्रावोने खेळाडूंना पैसे दिल्याशिवाय मैदानात जाऊ नये अशी धमकी दिली होती. ब्रावोच्या त्या धमकीनंतर बीसीसीआय मदत करण्यास पुढे आले होते. त्यानंतर ब्रावोने त्याच्या बोर्डासोबत बोलण्यास नकार दिला होता.
पीटरसनचा इंग्लंड क्रिकेट बोर्डासोबतचा विवाद
इंग्लंड क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट फलंदाज केविन पीटरसन याने गेली अनेक वर्षे इंग्लंड संघासाठी मोलाची भूमिका बजावली होती. परंतु २०१४मध्ये ॲशेस मालिकेत पराभूत झाल्यामुळे केविन पीटरसनला कारणीभूत ठरवत इंग्लंड संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. केविन पीटरसनला फक्त संघातूनच काढण्यात आले नव्हते तर, त्याला करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून देखील वगळण्यात आले होते.
त्यानंतर इसीबीने म्हटले होते की, “ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पराभूत झाल्यानंतर इंग्लंड संघाला उठून उभे राहण्याची गरज आहे. यासाठी संघातील खेळाडूंमध्ये विश्वास आणि कर्णधार कूक यांचे समर्थन आवश्यक आहे. याच कारणांमुळे पीटरसन शिवाय संघाला पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
कामरान अकमलचा पीसीबीसोबतचा वाद
पाकिस्तान संघाचा यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल याने देखील अनेक वर्ष पाकिस्तान संघासाठी क्रिकेट खेळले आहे. परंतु अनेकदा तो वादाच्या विळख्यात सापडला आहे. जेव्हा त्याला २०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या संघातून बाहेर करण्यात आले होते. तेव्हा त्याने निराशा व्यक्त केली होती. त्याने लिहिले होते की, ‘माझे नाव संघात न पाहणे माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. जेव्हा ऑस्ट्रेलियन व्हिसासाठी पीसीबीने माझा पासपोर्ट घेतला, तेव्हा मला माझ्या निवडीचा विश्वास वाटला. परंतु माझी निवड न झाल्यामुळे मी निराश झालो. खेळाडू फक्त संघात आपले स्थान परत मिळवण्यासाठी प्रदर्शन करू शकतात.’
श्रीलंकन संघातील खेळाडूंनी बोर्डाच्या वार्षिक कराराला दिला नकार
श्रीलंकन संघाने गेल्या काही वर्षात निराशाजनक कामगिरी केली आहे. तर दुसरीकडे खेळाडू आणि बोर्ड यांच्यात ताण तणाव वाढत चालले आहेत. श्रीलंकन संघातील तब्बल २४ खेळाडूंनी वार्षिक करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. यानंतर श्रीलंकन बोर्डाने देखील खेळाडूंवर संताप व्यक्त केला आहे. करारावर स्वाक्षरी करण्याची अंतिम मुदत म्हणून त्यांनी ३ जूनची तारीख निश्चित केली आहे. पगार वाढवावा अशी लंका खेळाडूंची मागणी आहे. पण ते मान्य करण्यास बोर्ड तयार नाही. आता शेवटच्या तारखेला काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
स्टुअर्ट ब्रॉडच्या होणाऱ्या नवरीची मोठी इच्छा; म्हणे, ‘मोठं कुटुंब पाहिजे, मुलं घरभर फिरतील’
पृथ्वी शॉ पाठोपाठ आता केकेआरच्या राहुल त्रिपाठीवरही पुण्यात पोलिसांचा कारवाईचा बडगा
जडेजामुळे माझं स्थान धोक्यात; ३ कसोटीत २७ विकेट्स घेणाऱ्या ‘या’ गोलंदाजाचा आरोप