भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहेत. २७ नोव्हेंबरपासून वनडे मालिकेने या दौऱ्याला सुरुवात होईल. कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी वनडे आणि टी२० मालिका होतील. विशेष म्हणजे या दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिकेचे जवळपास सर्व तिकीटे संपली आहेत. याची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुष्टी केली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकांच्या ६ पैकी ५ सामन्यांची सर्व तिकीटे विकली गेली आहेत. वनडे मालिकेतील पहिले दोन सामने सिडनी येथे होणार आहेत. तर तिसरा सामना कॅनबेरा येथे होणार आहे. त्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यांची तिकीटे संपली असून पहिल्या सामन्यातील काही तिकीटे शिल्लक आहेत.
तसेट टी२० मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा येथे तर शेवटचे २ सामने सिडनी येथे होणार आहेत. या सर्व सामन्यांची तिकीटेही विकली गेली आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारी(२० नोव्हेंबर) या सर्व सामन्यांची तिकीट विक्री सुरु झाली होती.
वनडे आणि टी२० मालिकांसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ५० टक्के प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
पहिला कसोटी सामनाही ऍडलेड येथेच होणार
याबरोबरच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणारी पहिली कसोटी देखील ऍडलेड येथेच होईल, अशी माहिती दिली आहे. हा कसोटी सामना दिवस-रात्र असणार आहे. खरंतर दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये मागील काही दिवसात कोरोना व्हायरसची अनेक प्रकरणे समोर आली. त्यानंतर लॉकडाऊन करण्यात आल्याने हा सामना ऍडलेडमधून दुसरीकडे हलवला जाईल अशी चर्चा होती. मात्र आता हा सामना ऍडलेड येथेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉकडाऊननंतर भारतात आयोजित पहिल्याच क्रिकेट स्पर्धेला कोरोनाचं ग्रहण; पुन्हा २ क्रिकेटपटू पॉझिटीव्ह
सामना संपल्यावर विराट थेट सुर्यकुमारकडे गेला अन् म्हणाला…
“आपल्या संस्कृतीत दोन कर्णधार होऊ शकत नाही, विराटला त्याच्या पदावर राहू द्या”