भारत आणि श्रीलंका यांच्यात येत्या जुलै महिन्यात ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ यावेळी इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सराव करण्यात व्यस्त असणार आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघात युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. या युवा संघाचे नेतृत्वपद शिखर धवनच्या हाती देण्यात आले आहे.
या संघात असेही काही खेळाडू आहेत, ज्यांची अवघ्या काही सामन्यांतील कामगिरी पाहून त्यांना संघात स्थान दिले गेले आहे. तर अशा अनेक खेळाडूंना दुर्लक्षित केले गेले आहे, जे गेल्या अनेक वर्षांपासून देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. चला तर पाहूया असे पाच खेळाडू, जे श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघ निवडीचे हक्कदार नव्हते.
चेतन सकारीया : राजस्थान रॉयल्स संघाचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज चेतन सकारीया याला श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. कोणालाही अपेक्षा नव्हती की, सौराष्ट्र संघासाठी खेळणार्या या गोलंदाजाला भारतीय संघात स्थान मिळेल. चेतन सकारीयाने आयपीएल २०२१ स्पर्धेत राजस्थान रॉयल संघाकडून खेळताना पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. त्याने पंजाब संघाविरुद्ध झालेल्या पदार्पणाच्या सामन्यात तीन गडी बाद केले होते. तसेच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये देखील त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परंतु श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघात स्थान देऊन निवडकर्त्यांनी अति घाई केली आहे, असे दिसून येत आहे.
ऋतुराज गायकवाड : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज ऋतुराज गायकवाड याला देखील श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. ऋतुराजने आयपीएल २०२१ स्पर्धेत ७ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने दोन अर्धशतकांचा मदतीने १९६ धावा केल्या होत्या. तसेच यूएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत देखील त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याची निवड झाल्यानंतर अनेकांनी प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. कारण श्रीलंका दौऱ्यावर राहुल तेवतिया आणि दीपक हुड्डा यांसारख्या खेळाडूंना संघात स्थान देता येऊ शकले असते. ऋतुराजचे प्रदर्शन त्यांच्या तुलनेत इतकेही प्रभावशाली नव्हते. तरीही त्याला भारतीय संघात स्थान दिले गेले आहे.
नवदीप सैनी: नवदीप सैनी हा वेगवान गोलंदाज आहे. परंतु त्याला आपले कौशल्य सिद्ध करण्याची खूप कमी संधी मिळाली आहे. ज्या सामन्यात त्याला संधी मिळाली आहे, त्या सामन्यात तो चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरला आहे. तसेच तो फिटनेसमुळेही अनेकदा संघाबाहेर राहिला आहे. तरीदेखील श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघात निवडकर्त्यांनी त्याला स्थान दिले आहे.
कृष्णप्पा गौतम: अष्टपैलू गोलंदाज कृष्णप्पा गौतम याला देखील श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी कृष्णप्पा गौतमपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे. तरीदेखील निवडकर्त्यांनी कृष्णप्पा गौतमला संघात स्थान दिले आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करणारा कृष्णप्पा गौतम याला यंदा एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तसेच गतवर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याला अवघे दोन सामने खेळण्याची संधी मिळाली होती. जर देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी पाहून त्याला संघात स्थान दिले असेल. तर दीपक हुड्डा आणि आवेश खान यांसारख्या खेळाडूंना दुर्लक्ष करण्यात आले आहे.
नितीश राणा: श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फलंदाज नितीश राणा याला देखील स्थान देण्यात आले आहे. त्याची या संघात निवड झाल्यामुळे अनेकांनी प्रश्नदेखील उपस्थित केले आहे. नितीश राणा याला संघात स्थान देणे यावरून स्पष्ट होत आहे की, निवडकर्ते काही खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्यापूर्वी इंडिया ए मध्ये आजमावून पाहत असतात. जसं की सूर्यकुमार यादव. याबाबतीत नितीश राणाने खूप कमी मेहनत केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘घरी नको जायला, खूप मार पडेल’; युवीने सांगितला २००७ विश्वचषकानंतरचा तो किस्सा
धोनीसोबतच्या मैत्रीमुळे भारतीय संघात देण्यात येत होती जागा? सुरेश रैनाने दिले ‘हे’ उत्तर
युजवेंद्र चहलच्या घरी आली ‘आनंदाची बातमी’, सोशलद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला खास क्षण