इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या 8 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला 7 गडी राखून पराभूत केले. कोलकाता संघाने 18 षटकांत केवळ 3 गडी गमावून 143 धावांचे लक्ष्य गाठले. कोलकाता नाइट रायडर्सचा या हंगामातील पहिला विजय होता, तर सनरायझर्सचा सलग दुसर्या सामन्यात पराभव झाला. सनरायझर्स हैदराबादचा संघ खूप मजबूत आहे, विशेषत: त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. असे असूनही कोलकाता नाईट रायडर्स सहज कसे जिंकू शकले? चला जाणून घेऊया या पराभवांची कारणे.
1. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला चांगली सुरुवात हवी होती आणि ती त्यांना मिळाली नाही. कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांविरूद्ध वॉर्नर आणि बेअरस्टो बेधडकपणे खेळू शकले नाहीत. चांगल्या फॉर्मात असलेला बेअरस्टो चौथ्या षटकात बाद झाला. त्याने 10 चेंडूत फक्त 5 धावा केल्या. यानंतर, कर्णधार वॉर्नर सेट झाल्यावर बाद झाला.
2. फलंदाजास चुकीच्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवणे, हेदेखील सनराइडर्स हैदराबादच्या पराभवाचे एक प्रमुख कारण होते. यंदा सनरायझर्स हैदराबादने प्रथमच ऋद्धिमान साहा ला संधी दिली आणि त्याला मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा आणि प्रियांम गर्ग यांच्या आधी फलंदाजीला पाठवले. लॉकडाउननंतर साहाचा हा पहिला सामना होता आणि तो चेंडू योग्यरित्या ‘कनेक्ट’ करू शकला नाही. साहाने 31 चेंडूंत केवळ 30 धावा केल्या, परिणामी संघ केवळ 142 धावांवर पोहोचू शकला.
3. सनरायझर्स हैदराबादची खराब गोलंदाजीही त्यांच्या पराभवाचे मोठे कारण होते. खलील अहमद आणि टी नटराजन हे खूपच महागडे ठरले आणि दोघांनीही प्रत्येक षटकात 9 च्या सरासरीने धावा दिल्या. भुवनेश्वर कुमारनेही 3 षटकांत 29 धावा देत काहीशी महागडी गोलंदाजी केली. राशिद खान आणि मोहम्मद नबी यांनी चांगली गोलंदाजी केली, पण त्यांना अन्य गोलंदाजांची साथ मिळाली नाही.
4. केकेआरकडून शुबमन गिल आणि ऑयन मॉर्गन यांच्यातील मोठी भागीदारी देखील सनरायझर्स हैदराबादसाठी एक मोठे कारण होते. गिलने नाबाद 70 धावा केल्या तर मॉर्गनने अवघ्या 29 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. या दोन फलंदाजांमध्ये चौथ्या विकेटसाठी 92 धावांची नाबाद भागीदारी रचली गेली.
5. पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्ती यांच्या धारदार गोलंदाजीने सनरायझर्स हैदराबादच्या पराभवाची कहाणी लिहिली गेली. कमिन्सने 4 षटकांत केवळ 19 धावा देऊन एक विकेट घेतली, तर वरुण चक्रवर्तीने जास्त अनुभव नसतानाही 4 षटकांत 25 धावा देत वॉर्नरची बहुमूल्य विकेट घेतली.