मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएल २०२२मधील ५६वा सामना सोमवारी (दि. ०९ मे) पार पडला. हा सामना नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आपल्या गोलंदाजीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्याने या सामन्यात केलेल्या गोलंदाजीमुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्स संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय प्राथमिकरीत्या योग्य ठरवला. यावेळी फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १६५ धावा केल्या. कोलकाताच्या ९ विकेट्समधील ५ विकेट्स या एकट्या जसप्रीत बुमराहने घेतल्या होत्या. त्यामुळे अशी कामगिरी करणारा तो मुंबईचा पाचवा गोलंदाज ठरला आहे.
Our 𝕃𝕀𝕆ℕ is roaring and how! 🦁💥
4⃣ – 1⃣ – 1⃣0⃣ – 5⃣ vs 𝗞𝗞𝗥#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvKKR @Jaspritbumrah93 pic.twitter.com/joVjpTmXp2
— Mumbai Indians (@mipaltan) May 9, 2022
जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्स
या सामन्यात जसप्रीत बुमराहने ४ षटके गोलंदाजी करताना १० धावा दिल्या आणि सर्वाधिक ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या. यावेळी त्याने १ निर्धाव षटकही टाकले. यामध्ये बुमराहने सर्वप्रथम आंद्रे रसेलला ९ धावांवर १४.२ षटकात बाद केले. त्यानंतर त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर नितीश राणाला ४३ धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर त्याने शेल्डन जॅक्सनला ५ धावांवर १७.१ षटकात बाद केले. तसेच, पॅट कमिन्स (१७.३) आणि सुनील नारायण (१७.४) यांना शून्य धावेवर तंबूत धाडले. अशाप्रकारे बुमराहने आपल्या ५ विकेट्स पूर्ण केल्या. ही बुमराहची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबईचा पाचवा गोलंदाज
यासह बुमराह मुंबईकडून एका डावात ५ विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज ठरला. त्याच्यापूर्वी लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, मुनाफ पटेल आणि अल्झारी जोसेफ यांनी अशी कामगिरी केली होती.
मुंबई इंडियन्सकडून एका डावात ५ विकेट्स घेणारे गोलंदाज
लसिथ मलिंगा
हरभजन सिंग
मुनाफ पटेल
अल्झारी जोसेफ
जसप्रीत बुमराह*
जसप्रीत बुमराहची आयपीएल २०२२मधील कामगिरी
जसप्रीत बुमराहने आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. कोलकाताविरुद्धच्या सामन्यापूर्वी बुमराहच्या नावावर १० सामन्यात ५ विकेट्स होत्या. मात्र, कोलकाताविरुद्धच्या सामन्यानंतर त्याच्या नावावर ११ सामन्यात ७.४१च्या इकॉनॉमी रेटने १० विकेट्स झाल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘…म्हणून वेंकटेश अय्यरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते’, प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने सांगितले कारण
पर्पल कॅपच्या शर्यतीत कुलदीप यादवला मोठा फटका, तर चहलला आव्हान देणार ‘हा’ गोलंदाज