वर्ष 2021 शेवटच्या घटकेला येऊन ठेपेले आहे. आता येणारे जे नवीन वर्ष आहे, ते एक उमेदीचे, यशाचे आणि आरोग्याचा प्रकाश घेऊन येईल अशी आशा सर्वांना आहे. आपल्या जीवनात आपण काय मिळवले आणि आपले हातातून काय सुटले हे अंतर्गत मूल्यमापन आपण करत असतो.आपल्या झालेल्या चूका या तशाच मागे सारून त्यातून शिकून आपण पुढे जाण्यास शिकवते.
2021 क्रिकेट जगताबद्दल म्हणायचे झाले तर, हे वर्ष क्रिकेट विश्वाला खूप चांगले ठरले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा नवा अवतार पाहायला मिळाला. न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनमध्ये बाजी मारली. टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलिया 14 वर्षानंतर चॅम्पियन्स झाला. मोहम्मद रिझवानची घणाघाती फलंदाजी पाहायला मिळाली.
पण आपण यावर्षीच्या क्रिकेट जगतातील वादविवाद झालेल्या घटना या लेखात आपण पाहणार आहोत. यावर्षी अनोखे वाद पाहायला मिळाले, त्यामुळे चाहत्यांना एक वेगळा धक्का मिळाला आहे. तर आपण पाहूया यावर्षीच्या क्रिकेट जगतातील मोठ्या वादांबद्दल.
आयपीएल 2021 दरम्यान कोरोनाने बायो-बबलमध्ये केला शिरकाव
भारतात कोरोनाने मोठे जाळे पसरले होते. त्यामुळे 2020 ची आयपीएल यूएईमध्ये आयोजित करण्यात आली आणि ती यशस्वी झाली. परंतु, 2021 ची आयपीएल भारतात आयोजित केली गेली. परंतु, आयपीएल 2021 सुरू असतानाच बायो-बबलमध्ये कोरोनाने आपली एन्ट्री केली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादचे काही सदस्य पॉझिटिव्ह आढळले होते.
बीसीसआयला त्यामुळे तातडीने स्पर्धा पुढे ढकलावी लागली. त्यानंतर भारतात आयपीएलचे आयोजन करण्यावर बरीच चर्चा झाली, त्यामुळे बराच वादही झाला. स्पर्धा पुढे गेल्याने परदेशी खेळाडू मायदेशी परतले. अखेर बोर्डाने आयपीएल 2021 चे उर्वरित सामने टी20 विश्वचषकापूर्वी यूएईमध्ये आयोजित केले.
पाकिस्तान क्रिकेट जगताला हादरवून लावणारा कलंक ठरला.
पाकिस्तान म्हटलं की वाद होणार नाही, असं होणारच नाही. पाकिस्तान आणि वाद हे एक समीकरणच तयार झालं आहे. पाकिस्तानी क्रिकेटमध्ये काही ना काही वाद होतंच असतात. 2009 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दुष्काळ पाकिस्तानात होता. पण जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाकिस्तानमध्ये पुन्हा सुरुवात झाले, तेव्हा, 2021 मध्ये त्यांना मोठा धक्का बसला. न्यूझीलंड संघ पाकिस्तानात पोहचला, परंतु सामना व्हायच्या आधीच दौरा रद्द केला. त्यानंतर लगेच इंग्लंडने सुद्धा सुरक्षेचे कारण देत दौरा रद्द केला. याबद्दल बरीच चर्चा झाली.
त्याचदरम्यान, पाकिस्तानचे माजी कर्णधार रमिझ राजा यांचा पीसीबी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर लगेचच पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक, गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे या दोघांवर जबरदस्त टीकेचा कलंक लावण्यात आला.
इंग्लंड क्रिकेटच्या कपाळावर जातीयतेचे चटके
इंग्लंडचा काउंटी संघ यॉर्कशायर हा वांशिक भेदभावाने कलंकित झाला होता. यॉर्कशायरचा माजी कर्णधार अझीम रफिक याने क्लबच्या खेळाडूंवर वांशिक भेदभावाचा आरोप केला होता. चौकशी केली असता ते आरोप खरे असल्याचे समजले. त्यानंतर यॉर्कशायर आणि इंग्लंडचे क्रिकेटर गॅरी बलन्स यांनी ते मान्य केले. आरोप सिद्ध झाल्यावर इंग्लंड क्रिकेट बोर्डाची जगभरात बदनामी झाली. यॉर्कशयरचे अध्यक्ष रॉजर हटन यांनाही राजीनामा द्यावा लागला आणि मायकल वॉर्नवर वांशिक टीकेचा गंभीर आरोप झाला. त्यामुळे बीसीसीने समालोचक टीममधून काढून टाकले.
टीम पेनला कसोटी कर्णधारपदाचा द्यावा लागला राजीनामा
टीम पेनवर क्रिकेट तस्मानियामध्ये काम करणाऱ्या एका महिलेने अश्लील फोटोशूट गलिच्छ मेसेज पाठवल्याचे आरोप केला होता. जेव्हा हे जगासमोर आले, तेव्हा टीम पेनने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देत क्रिकेटमधून ब्रेक घेतला. त्याच्यानंतर पॅट कमिन्सला नवा कसोटी कर्णधार करण्यात आले.
विराट कोहलीची एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून विसर्जन.
2021 मधील सर्वात मोठा आणि शेवटचा वाद म्हणजे विराट कोहलीच्या कर्णधारपदाचा राजीनामा. भारतीय संघाने त्याच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद गमावले, तेव्हा कोहलीवर टीकेचा भडिमार करण्यात आला. त्यानंतर भारताने त्याच्याच नेतृत्वाखाली टी२० विश्वचषक ही गमावला. टी२० विश्वचषकापूर्वी त्याने घोषणा केली की टी२० कर्णधार म्हणून त्याची ही अखेरची स्पर्धा असेल. त्यापूर्वी त्याने आयपीएल संघ आरसीबीचे कर्णधारपदही सोडले.
त्यानंतर अचानक त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्याअगोदर एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून काढण्यात आले आणि रोहित शर्माच्या हातात मर्यादीत षटकांच्या भारतीय संघाची धुरा दिली.
हे असले तरी, बीसीसआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनी कोहलीला टी20 कर्णधारपद सोडू नको, अशी विनंती केली होती. मात्र, कोहलीने त्याचा निर्णय बदलला नाही. परंतु, दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी कोहलीने गांगुलीचा हा दावा फेटाळून लावला. त्यामुळे या वादाला एक नवीन वळण मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित, रितीकाने असा साजरा केला लाडक्या लेकीचा वाढदिवस; विराटची पत्नी कमेंट करत म्हणाली…
बाबा विराटला चीयर करण्यासाठी पहिल्यांदाच वामिका स्टेडियममध्ये, आई अनुष्कासोबत कॅमेरात कैद
“याला आत्ताच बाद करायचं”, विराटने दिले आदेश अन् बुमराहने केला चमत्कार