सध्या श्रीलंका संघ इंग्लंडमध्ये टी20 सामन्यांची मालिका खेळत आहे. परंतु श्रीलंका संघाच्या इंग्लंड मधील मैदानावरील प्रदर्शनावर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. श्रीलंका संघाला 3 टी20 सामन्यांच्या मालिकेमध्ये 3-0 ने हार पत्करावी लागली आहे. श्रीलंका संघाच्या पराभवानंतर चाहत्यांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. परंतु श्रीलंकेचे खेळाडू इंग्लंडमध्ये रात्री मजा करत असताना दिसून आले आहेत. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. क्रिकेटपटू कुसल मेंडीस आणि निरोशन डीकवेला यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते बायो बबल तोडत असलेले दिसून येत आहेत. या घटनेची सध्या चौकशी सुरू आहे.
श्रीलंका संघ सध्या 3 टी 20 आणि अनेक एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंड मध्ये आहे. टी 20 मध्ये श्रीलंका संघाने चांगली कामगिरी गेली नाही, पण आता वनडे मालिकेत काय होते ते पाहायचे बाकी आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना 29 जून रोजी खेळला जाणार आहे. श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंचा व्हिडिओ शेअर करताना यूकेच्या एका ज्येष्ठ पत्रकाराने लिहिले आहे की, ‘आज रात्री डरहममधील परिचित चेहरे, त्यांच्या दौर्याचा आनंद घेत आहेत. खरच हे खेळाडू क्रिकेट खेळण्यासाठी येथे आले नाही.’ हा व्हिडिओ रविवारी 23.28 वाजता बनविण्यात आला आहे. या क्रिकेटपटूंनी मैदानावर निराशाजनक कामगिरी केली पण डरहममध्ये आपल्या रात्रीचा आनंद घेण्यास ते विसरले नाहीत, असा नाराजीचा सूर आता उमटतो आहे.
Familiar faces in Durham tonight, enjoying their tour! Obviously not here to play cricket, this video was taken at 23.28 Sunday. Disappointing performance by these cricket players but not forgetting to enjoy their night at Durham. RIP #SrilankaCricket #KusalMendis #ENGvSL pic.twitter.com/eR15CWHMQx
— Nazeer Nisthar (@NazeerNisthar) June 28, 2021
याच दरम्यान, एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंकेच्या संघ व्यवस्थापक मनुजा करियाप्परुमा यांनी या घटनेची माहिती घेतली असून संघ व्यवस्थापन या उल्लंघनाची चौकशी करत आहे. हे पथक सध्या डरहममध्ये आहे. कुसल मेंडिस आणि डिकवेला यांना ज्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले होते ते हॉटेलच्या जवळचे ठिकाण दिसत नाही. मात्र, क्रिकेटपटूंनी प्रत्यक्षात प्रोटोकॉलचे उल्लंघन केले की नाही याची पुष्टी अद्याप झालेली नाही, असे मनुजा म्हणाले. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, दोन्ही क्रिकेटपटू प्रोटोकॉलमधून बाहेर पडताना मजा करत आहेत.
या दोन्ही क्रिकेटपटूंनी जर खरोखरच प्रोटोकॉल तोडला असल्यास त्यांना काही दिवस संघातून काढून घेण्यात येईल. जर असे झाले तर दोन्ही खेळाडू पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर पडतील. यासाठी श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) देखील या दोघांनाही कठोर शिक्षा करू शकते.
दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत देखील या दोन खेळाडूंना फारशी खास कामगिरी करता आली नाही. कुसल मेंडिसने 3 टी20 सामन्यात 98.18 च्या खराब स्ट्राईक रेटसह 54 धावा केल्या. यामध्ये 39 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. तर डिकवेलाने दोन टी 20 सामन्यांत केवळ 14 धावा केल्या आणि यष्टीरक्षणात देखील त्याने फारसे काही केले नाही. या संघाच्या खराब कामगिरीबद्दल यापूर्वीच टीका केली जात आहे. आणि ताज्या घटनेने त्यांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
बाजीगर! गोष्ट पाच तासांत तीन सुवर्ण जिंकणाऱ्या दीपिका कुमारीची
देशाचे दुर्दैव! आशियाई सुवर्णपदक विजेता खेळाडू विकतोय चहा
गार्डनमध्ये रोहितनं केली आपल्या चिमुकलीसह मस्ती; सोबतच दिसली समायराची गोंडस मैत्रीण