घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व ३ चा नुकताच लिलाव पार पडला. मागील दोन पर्वातील एक उत्कृष्ट संघ असलेल्या भटवाडी साईदर्शन पॅकर्सने तिसऱ्या पर्वात आपल्या संघ मजबूत बनवला आहे. जॉली क्रीडा मंडलामधील यावर्षीची सर्वाधिक बोली लागलेला अभिषेक नर यासंघांत असणार आहे. उपनगर मधील स्टार खेळाडु पवन मोरे सुद्धा भटवाडी संघात असणार आहे.
भटवाडी साईदर्शन पॅकर्स संघाचे मालक गुरुनाथ सामंत हे क्रिकेट ब कबड्डीचे विशेष आवड असलेले यांनी टेनिस क्रिकेट मध्ये हे भटवाडी साई दर्शन संघ पुरस्कृत केला आहे. संघाच्या प्रशिक्षकपदी सागर नार्वेकर हे काम पाहणार आहेत. चेंबूर क्रीडा केंद्राचे राष्ट्रीय खेळाडु व भारत पेट्रोलियमभारत पेट्रोलियम व्यावसायिक संघाचे खेळाडु आहेत. संघ व्यवस्थापक म्हणून शेखर नाईक हे काम पाहणार आहेत.
घाटकोपर प्रतिष्ठान व आयोजित पार्वतीबाई बाबाजी सावंत फौंडेशन पुरस्कृत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व ३ चा आयोजन करण्यात आलं आहे.
भटवाडी साईदर्शन पॅकर्स संघ
१) पवन मोरे
२) अभिषेक नर
३) विवेक कुंभार
४) विक्रांत कुडवे
५) संदेश ताठे
६) हर्ष तोडणकर
७) मनीष सावंत
८) ओमकार जाधव
९) शुभम गौतम
१०) कुणाल पवार
११) राहुल हेडगे
१२) संजय भारती
प्रशिक्षक- सागर नार्वेकर
व्यवस्थापक– शेखर नाईक