---Advertisement---

दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी असे असतील १९ वर्षाखालील महाराष्ट्र कबड्डी संघ

On: शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2019 11:30 AM
---Advertisement---

१९ वर्षाखालील मुले/मुली राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा २०१९-२० क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद, नाशिक यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती.

मराठा विद्याप्रसारक समाजाचे के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक येथे ही स्पर्धा पार पडली. १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान स्पर्धा त्यानंतर निवड चाचणी घेण्यात आली.

सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील कोल्हापूर, लातूर, अमरावती, मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे व औरंगाबाद असे ८ विभागातील मुलाचे ८ व मुलीचे ८ संघानी सहभाग घेतला होता.

मुलाच्या गटात पुणे विभागाने तर मुलीच्या गटात कोल्हापूर विभागाने विजेतेपद पटकावले. काल १७ ऑक्टोबर रोजी निवड चाचणी पार पडली यातून राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली आहे. १७ ते २० नोव्हेंबर २०१९ दरम्यान दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

संक्षिप्त निकाल:-

मुले:-
विजेते- पुणे विभाग
उपविजेते- अमरावती विभाग
तिसरे स्थान- कोल्हापूर विभाग

मुली:-
विजेते- कोल्हापूर विभाग
उपविजेते- मुंबई विभाग
तिसरे स्थान- पुणे विभाग

१९ वर्षाखालील महाराष्ट्र संघ मुले:-

वैभव गरजे (औरंगाबाद), वैभव शिंदे (पुणे), युवराज शिंदे (अमरावती), संभाजी वाबले (पुणे), प्रशांत नागरे (अमरावती), अर्जुन करंडे (पुणे), गौरव पाटील (कोल्हापूर), अंकुश मेश्राम (नाशिक), सुरेश जाधव (औरंगाबाद) लहू राठोड (लातूर), सूरज पाटील (नाशिक), ओंकार गाडे (पुणे)

राखीव:- राज आचार्य (मुंबई), विकी हुंदलेवाडकर (कोल्हापूर), आदित्य वाघमारे (मुंबई) ओंकार पोकळे (नाशिक), ललीत जाधव (अमरावती)

१९ वर्षाखालील महाराष्ट्र संघ मुली: –

सानिका पाटील (कोल्हापूर), करीना कामतेकर (मुंबई), प्रीती शिंदे (कोल्हापूर), दिव्या गायगोले (पुणे), शीतल मेहेत्रे (औरंगाबाद), सुनंदा पवार (नाशिक), सानिका पाटील (मुंबई), तृप्ती अंधारे (लातूर), आरती नागरे (औरंगाबाद), मंजुळ पवार (अमरावती), अनुष्का फुगे (पुणे), आरती मतकरे (मुंबई)

राखीव:- वैष्णवी पासारकर (अमरावती), मेघा चोरमारे (कोल्हापूर), सोनाली सलामे (नागपूर), रोहिणी गायकवाड (लातूर), मालती गांगुर्डे (नाशिक)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---