---Advertisement---

कॅप्टन वगैरे तुमच्या देशात! आयपीएलमध्ये फक्त खेळाडू म्हणून खेळलेले विदेशी कर्णधार

On: गुरूवार, एप्रिल 1, 2021 11:30 AM
---Advertisement---

कोणत्याही क्रिडा प्रकारात देशाचे नेतृत्व करायला मिळणे हि एक अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट असते. मग ते क्रिकेटसारख्या खेळात असल्यास अजूनच चमकून दिसते. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशाचे नेतृत्व केले म्हणजेच तुम्ही खेळत असलेल्या प्रत्येक संघाचे तुम्ही कर्णधार असाल असे नाही, आणि आयपीएलच्या बाबतीत तर नाहीच नाही.

आयपीएलमध्ये आपण अनेक धुरंधर आणि दर्जेदार कर्णधार पाहिले आहेत. मात्र, या लेखात आपण अशा खेळाडूंची माहिती घेणार आहोत ज्यांनी देशाचे कर्णधारपद भूषवले परंतु आयपीएलमध्ये कधीही त्यांच्याकडे संघाचे नेतृत्व दिले गेले नाही.

शाकिब अल हसन
बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार राहिलेल्या शाकिब अल हसनला आयपीएलमधील एक मोठा खेळाडू मानले जाते. २०११ असून तो आजतागायत कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना दिसून आला. त्याने आपल्या आयपीएल कारकीर्दीत ६३ सामने खेळताना आपल्या संघांसाठी एकहाती अनेक सामने जिंकून दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध खेळाडू असला तरी शाकिबने आजतागायत एकाही सामन्यात आयपीएलमध्ये कोणत्याही संघाचे नेतृत्व केले नाही.

ख्रिस गेल
‘युनिव्हर्स बॉस’या नावाने ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ख्रिस गेल टी२० क्रिकेटचा सर्वात मोठा खेळाडू मानला जातो. आयपीएलमधील अनेक विक्रम त्याच्या नावे जमा आहेत. तो अगदी पहिल्या आयपीएल हंगामापासून आयपीएलची जोडला गेला आहे. यादरम्यान त्याने कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व पंजाब किंग्सचे प्रतिनिधित्व केले. मात्र, तो अजून एकदाही कर्णधार झाला नाही.

लसिथ मलिंगा
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून लसिथ मलिंगाला ओळखले जाते. मुंबई इंडियन्सने पटकावलेल्या पाच आयपीएल विजेतेपदांपैकी चार वेळा तो संघाचा भाग होता. मात्र, २००८ ते २०१९ पर्यंत मुंबईसाठी खेळणाऱ्या मलिंगाला कर्णधार म्हणून कधीही संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे, श्रीलंकेने २०१४ मध्ये जिंकलेल्या टी२० विश्वचषकावेळी मलिंगा श्रीलंका संघाचा कर्णधार होता.

महत्त्वाच्या बातम्या-

आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण यादी; या ४ भारतीयांचा आहे समावेश

आयपीएलच्या इतिहासातील ३ सर्वात रोमांचक अंतिम सामने

आयपीएलमध्ये ज्या संघाकडून खेळले, त्याच संघाचे महागुरू झालेले ५ दिग्गज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---