भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आज(15 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने आज सोशल मीडियावरुन त्याच्या निवृत्तीची घोषणा केली.
23 डिसेंबर 2004 ला बांगलादेश विरुद्ध वनडे सामन्यातून धोनीने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 530 पेक्षाही अधिक सामने खेळले. तसेच 17 हजांरापेक्षा अधिक धावा केल्या. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना 2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध जूलैमध्ये खेळला आहे.
https://www.instagram.com/p/CD6ZQn1lGBi/
धोनीने याआधीच डिसेंबर 2014 ला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 6 शतकांचा आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे कसोटीत धोनीच्या एका द्विशतकाचाही समावेश आहे. त्याने 2013 मध्ये चेन्नईत झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 224 धावांची खेळी केली होती.
तसेच धोनी सर्वाधिक वनडे सामने खेळणारा भारताचा सचिन तेंडूलकर नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू आहे. धोनीने त्याच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत 350 वनडे सामने खेळले असून यात त्याने 10 शतके आणि 73 अर्धशतकांसह 50.57 च्या सरासरीने 10773 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर भारताकडून धोनीने 98 टी20 सामन्यात 2 अर्धशतकांसह 1617 धावा केल्या आहेत. तो भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.
याबरोबरच धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाराही क्रिकेटपटू आहे. त्याने भारताचे 332 सामन्यात नेतृत्व केले आहे. तसेच आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकणारा धोनी पहिलाच कर्णधार आहे.
त्याने 2007 मध्ये टी20 विश्वचषक, 2011 मध्ये वनडे विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन स्पर्धांची विजेतेपद कर्णधार म्हणून मिळवली आहेत.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: या ५ कारणांमुळे केएल राहुल कर्णधार म्हणून होऊ शकतो यशस्वी
कोण होणार कॅरेबियन प्रिमियर लीग २०२० चा किंग?
वनडे क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे २ संघ
महत्त्वाच्या बातम्या –
‘सीपीएलमधून येणाऱ्या खेळाडूंना होणार आयपीएलमध्ये फायदा,’ विश्वविजेत्या खेळाडूने केले वक्तव्य
भारताच्या माजी दिग्गज क्रिकेटरची तब्येत नाजूक, आहे व्हेंटिलेटरवर सपोर्टवर
टी२० क्रिकेटमध्ये रचला गेला इतिहास, ४ चेंडूवर ४ विकेट्स घेताना गोलंदाजाने दिली केवळ १ धाव






