जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांच्या अंतराने पराभूत झाला. या पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा टीकाकारांच्या चांगलाच निशाण्यावर आहे. रोहित शर्मा मागच्या वर्षी विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर तिन्ही प्रकारांमध्ये भारताचा कर्णधार बनला. असे असले तरी, त्याला वैयक्तिक आणि संघिक प्रदर्शनामुळे नेहमी टीकेचा सामना करावा लागाल आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने मात्र रोहितची पाठराखन केली आहे.
मायकल क्लार्क (Michael Clarke) याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीती रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यावर विश्वासक कायम असल्याचे सांगितले. क्लार्क म्हणाला, “रोहित शर्मा खूप चांगला कर्णधार आहे. त्याच्यावर मी माझा विश्वास कायम ठेवेल. त्याला आक्रमक भूमिका आवडते. मुंबई इंडियन्ससोबत त्याला खूप यश मिळाले आहे. त्याने भारतासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली नाही, त्यामुळे तो भारताचे नेतृत्व करण्यासाठी योग्य नाही, असे म्हणता येणार नाही.”
“रोहित शर्मा भारताचे कर्णधारपद सांभाळल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. एक फलंदाज म्हणून वैयक्तिक प्रदर्शन चांगले केले आहे. त्याच्या कसोटी शतकांचा एकदा विचार करा. तो एक चांगला कर्णधार आहे. एखाद्या स्पर्धेचा अंतिम सामना गमावल्यामुळे तो खराब कर्णधार होत नाही. सोबतच भारतीय संघाला देखील खराब बनवत नाहीये,” असे क्लार्क या मुलाखतीत पुढे म्हणाला.
दरम्यान, भारतीय संघ यावर्षी सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला. डब्ल्यूसीटी 2023 हंगामात भारताने मायदेशातील तिन्ही कसोटी मालिका जिंकल्या. विदेशातील मालिकांचा विचार केला, तर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत बारताने 2-2 अशी बरोबरी केली होती. बांगलादेशविरुद्धची मालिका 2-0 अशा अंतराने जिंकली होती. तर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 2-1 अशा अंतराने पराभव स्वीकारला होता. यावर्षी भारत सलग दुशऱ्यांदा डब्ल्यूटीसी स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला. (Former Australia captain Michael Clarke backed Rohit Sharma)
महत्वाच्या बातम्या –
व्वा… काय कॅच आहे! अश्विनने हवेत झेप घेत पकडला अद्भूत झेल, व्हिडिओ तर बघावाच लागतोय
बापरे! बाल्कनीत बसून सामना पाहत होती महिला, फलंदाजाने षटकार मारल्यानंतर पुढे काय घडलं पाहाच