भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना पर्थच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी पर्थ कसोटी पराभवानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघावर टीका होत आहे. या पराभवानंतर क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ॲलन बॉर्डर (Allan Border) यांनी संघावर निशाणा साधला आहे.
ॲलन बॉर्डर (Allan Border) म्हणाले, पर्थमधील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघ विराट कोहलीच्या (Virat Kohli) फलंदाजीवर नियंत्रण ठेवू शकला नाही. यामुळे त्यांना 5 सामन्यांची मालिकाही गमवावी लागू शकते. गेल्या दीड वर्षात एकही कसोटी शतक न झळकावलेल्या कोहलीने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात पुनरागमन करत नाबाद 100 धावा केल्या. भारताने हा कसोटी सामना 295 धावांनी जिंकला.
ॲलन बॉर्डरने (Allan Border) ‘सेन रेडिओ’शी बोलताना सांगितले की, “ऑस्ट्रेलिया संघाने विराट कोहलीला ज्याप्रकारे शतक झळकावण्याची परवानगी दिली त्यामुळे मी खूप निराश आहे, त्याने (कोहली) संपूर्ण मालिकेत अशाप्रकारे आत्मविश्वासाने खेळावे अशी आमची इच्छा नाही.”
ॲलन बॉर्डरने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) रणनीतीवरही प्रश्न उपस्थित केले आणि म्हटले की, “न्यूझीलंडविरूद्धच्या घरच्या मालिकेत संघर्ष करताना दिसलेल्या कोहलीला फॉर्ममध्ये परतण्याची संधी दिली.”
ॲलन बॉर्डर (Allan Border) हे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार राहिले आहेत. त्यांच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत 1979 मध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून 1994 पर्यंत त्यांनी 156 कसोटी सामने खेळले. त्यामध्ये बाॅर्डर यांनी 265 डावात फलंदाजी करताना 50.56च्या सरासरीने फलंदाजी करताना 11,174 धावा केल्या आहेत. दरम्यान त्यांनी 63 अर्धशतकांसह 27 शतके आणि 2 द्विशतके झळकावली. कसोटीत त्यांची सर्वोच्च धावसंख्या 205 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
SMAT; टी20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास, दिल्लीच्या नावावर अनोख्या विश्वविक्रमाची नोंद
NZ vs ENG: अद्भुत, अविश्वसनीय..! ग्लेन फिलिप्सनं पकडला आश्चर्यकारक झेल, पाहा VIDEO
चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये होणार? पाहा राजीव शुक्ला यांचे टीम इंडियाबाबत मोठे अपडेट