भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्मशी झगडत आहे. सततच्या खराब प्रदर्शानंतर विराटवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत. परंतु दुसरीकडे क्रिकेटविश्वातील अनेक माजी दिग्गज विराटचे समर्थन करताना दिसतात. या दिग्गाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाला दोन विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार रिकी पॉंटिंगही सहभागी झाला आहे.
अनेकांच्या मते विराट कोहली (Virat Kohli) सतत खराब प्रदर्शन करत आहे आणि त्याला संघातून वगळले गेले पाहिजे. पण माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉंटिंग (Ricky Ponting) याच्या मते विराटला संघात कायम ठेवले पाहिजे. पॉटिंग आयसीसी रिव्यूमध्ये संजना गणेशनसोबत बोलत होता. चर्चेतदरम्यान पॉंटिंगने असेही मत व्यक्त केले, की विराटला जार संघातून वगळले गेले, तर पुनरागमन करणे त्याच्यासाठी सोपे नसेल.
ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्याच्या मते विराटला आगामी काळात ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकात संधी मिळाली पाहिजे. आयसीसीसाठी दिलेल्या मुलाखतीत रिकी पॉंटिंग म्हणाला की, “मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की, त्याच्यापुढे काही आव्हाने आहेत. त्याचे खूप खडतर दिवस चालू आहेत. मी अनेक महान खेळाडूंना या काळातून जाताना पाहिले आहे. मग तो फलंदाज असो किंवा गोलंदाज. प्रत्येकजण अशा काळातून गेला आहे. जर त्याला टी-२० विश्वचषातून वगळले गेले, तर नंतर पुनरागमन करणे त्याच्यासाठी खूप कठीण असेल.”
पॉंटिंग यावेळी असेली म्हटला की, “जर एखाद्या सामन्यात मी विरोधी संघाचा कर्णधार असतो आणि समोर विराट कोहली प्रतिनिधित्व करत असलेला भारतीय संघ असता, तर मला भीती वाटली असती. मात्र, विराटसाठी ही फक्त वेळीचे गोष्ट (फॉर्म) आहे.” चर्चेतदरम्यान असे दिसले की, विराट पुनरागमन करेल, याचा पॉंटिंगला आत्मविश्वास आहे.
दरम्यान, विराटच्या फॉर्मचा विचार केला, तर मागच्या अडीच वर्षांपेक्षा जास्त दिवसांपासून त्याच्या बॅटमधून एकही शतक निघाले नाहीये. अशात चाहत्यांनामध्येही त्याचे शतक पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकता आहे. पॉंटिंगच्या मते भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी संघाच्या वरच्या फळीत विराटसाठी जागा कायम ठेवली पाहिजे. तसेच किमान विश्वचषक स्पर्धेतपर्यंत त्याला संघात कायम ठेवले पाहिजे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पहिलीच ओव्हर अन् हॅट्रिक, ‘वाह क्या बात है!’ न्यूझीलंडच्या गोलंदाजाने रचलाय विक्रम