ऑस्ट्रेलियन क्रिकेटला दुःख देणारी एक बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियासाठी एक कसोटी सामना खेळलेले मात्र प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नावावर असलेल्या पीटर ऍलन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. एका प्रथमश्रेणी सामन्याच्या एका डावात दहा बळी मिळवणाऱ्या तीन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपैकी ते एक होत.
पीटर यांचा जन्म क्वीन्सलँड येथे 1935 मध्ये झाला. त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेट क्वीन्सलँड संघासाठी खेळले. क्वीन्सलॅंड संघासाठी सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम देखील त्यांच्याच नावे जमा आहे. 1965 ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी त्यांना मिळाली होती. ते या सामन्यात केवळ दोन बळी घेऊ शकलेले.
Peter Allan, formerly Queensland's all-time leading Shield wicket-taker and one of just three Aussies to take 10 wickets in a first-class innings, has died aged 87:https://t.co/S4LnmjuxcA
— cricket.com.au (@cricketcomau) June 23, 2023
दुसऱ्या कसोटीतून त्यांना डावलले गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शेफिल्ड शिल्ड स्पर्धेचा मार्ग धरला. त्यांनी विक्टोरिया विरुद्ध 61 धावा देत सर्व दहा गडी बाद करण्याचा पराक्रम करून दाखवला. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी केवळ तीनच गोलंदाजांना करता आली आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीसाठी त्यांना पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघात संधी मिळाली. परंतु, सामन्याच्या आदल्या दिवशी दुखापतग्रस्त झाल्याने त्यांना पुन्हा ऑस्ट्रेलियासाठी खेळता आले नाही.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी 1985 ते 1991 या काळात क्वीन्सलँड क्रिकेट असोसिएशनसह काम केले. 2000 मध्ये त्यांना ऑस्ट्रेलिया स्पोर्टस मेडलने देखील गौरवण्यात आले होते.
(Former Australian Cricketer Peter Allen Died At 87)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय वेगवान माऱ्यात आणखी एक भरती! वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी आयपीएल गाजवलेल्या गोलंदाजाला संधी
सर्फराजशी पुन्हा धोका! देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पहाड रचूनही टीम इंडियाचे दार बंदच