ऑस्ट्रेलियाचे दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) याचे पार्थिव शरीर (Shane Warne Dead Body) गुरुवारी (१० मार्च) बँकॉकच्या त्याच्या राहत्या शहरात मेलबर्न (Melbourne) येथे आणण्यात आले आहे. खासगी जेटने गुरुवारी (१० मार्च) रात्री जवळपास साडे आठ वाजता ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रध्वजात त्याचे पार्थिव शरीर गुंडाळून आणले गेले. ३० मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी, MCG) राजकीय सन्मानासोबत त्याच्यावर अंत्यसंस्कार (Shane Warne Funeral) केले जातील.
न्यूज. कॉम. एयूच्या वृत्तानुसार, “फिरकीचा जादूगार वॉर्नचे पार्थिव शरीर आणणारे खासगी जेट गुरुवारी रात्री जवळपास साढे आठ वाजता मेलबर्नच्या एस्सेनडन फिल्ड विमानतळावर उतरवले गेले. त्याच्या पार्थिव शरीराला नेण्यासाठी त्याचे साहाय्यक हेलेन नोलनसहित प्रशंसक आणि मित्रही विमानतळावर आले होते. यापूर्वी बँकॉकमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ध्वजात गुंडाळलेली वॉर्नची शवपेटी थाई पोलिस फॉरेन्सिक इन्स्टिट्यूटच्या रुग्णवाहिकेतून आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आली होती.”
एमसीजीवर होणार अंतिम संस्कार
वॉर्नला ४ मार्च रोजी थायलँडच्या कोह सामुई बेटावर हृदयविकाराचा झटका आला होता. तो तिथे मित्रांसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गेला होता. तसेच तो मृत्यूपूर्वी वजन कमी करण्यासाठी कडक डाएटवरही होता. आता व्हिक्टोरिया प्रदेश सरकार ३० मार्च रोजी वॉर्नच्या आवडत्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर राजकीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करेल.
व्हिक्टोरियाचे प्रधानमंत्री डॅनियल एंड्रयूज यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, ‘वॉर्नीला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडव्यतिरिक्त इतर कोणत्याही मैदानावर निरोप दिलाच जाऊ शकत नाही.’ तत्पूर्वी त्याचे कुटुंबीय वैयक्तिकपणे त्याच्यावर अंत्यसंस्कार करतील.
शेन वॉर्नचे एमसीजीशी आहे खास नाते
दरम्यान मेलबर्नच्या मैदानावर वॉर्नने अनेक अविस्मरणीय विक्रम केले आहेत. त्याने १९९४ मध्ये ऍशेस मालिकेत हॅट्रिक घेतली होती. तर २००६ साली मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी खेळताना कारकिर्दीतील ७०० वी कसोटी विकेटही घेतली होती. त्याने त्याच्या कारकिर्दीत १४५ कसोटी खेळताना एकूण ७०८ विकेट्स घेतल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण १००१ विकेट्सची नोंद आहे. यात वनडेतील २९३ विकेट्सचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक धक्का! वॉर्नर सुरुवातीच्या पाच सामन्यांतून बाहेर
… म्हणून मी पीएसएल खेळत नाही; स्वतः वॉर्नरने सांगितले कारण
वाढदिवस विशेष: कॅरम बॉलचा जनक अजंथा मेंडिस