---Advertisement---

विश्वचषक खेळलेल्या क्रिकेटपटूची आता झालीय दयनीय अवस्था, पोटासाठी करतोय चक्क सुतारकाम

On: शुक्रवार, मे 21, 2021 4:22 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर बऱ्याचशा क्रिकेटपटूंना पुरेसे पैसे मिळतात, ज्यातून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांचे दिवस सुखात जातील. परंतु प्रत्येकाच्या बाबतीतच हे घडेल असे होत नाही. ऑस्ट्रेलिया संघाचा एक असा क्रिकेटपटू आहे, ज्याला घर चालवण्यासाठी नवीन काम शिकावे लागत आहे. तो क्रिकेटपटू म्हणजे, जेवियर डोहर्टी.

ऑस्ट्रेलियन संघाकडून २०१५ सालचा विश्वचषक खेळलेला फिरकी गोलंदाज जेवियर डोहर्टी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे तो क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसत नाही. परंतु क्रिकेट सोडल्यानंतर त्याला आपले घर चालवण्यासाठी सुतारकाम करावे लागत आहे. त्याचा एक व्हिडिओ ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये जेवियर डोहर्टी सुतारकाम करताना दिसून येत आहे.

जेवियर डोहर्टीने या कामाबाबत बोलताना म्हटले की, “जेव्हा क्रिकेट कारकिर्द पूर्ण होते, तेव्हा आपल्याला समजते की आता पैसा कुठून येणार. आपल्या डोक्यात नेहमी या गोष्टी सुरू असतात की, पुढे काय होणार? पुढील आयुष्य कसे असेल? अशा परिस्थितीत खेळाडू विकास व्यवस्थापक आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या ट्रान्झिशन मॅनेजर कार्ला यांनी मला फोनद्वारे मदत केली. शिक्षणासाठी पैसेही पुरवले. यामुळे आर्थिक मदत झाली आणि माझा खर्चही कमी झाला.”

https://twitter.com/ACA_Players/status/1394558783892844549?s=20

जेवियर डोहर्टीची कारकीर्द
जेवियर डोहर्टीने ऑस्ट्रेलियन संघाचे तीनही प्रकारात प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियन संघात पदार्पण केले होते. त्यानंतर २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. या ७ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ४ कसोटी सामन्यात ७८.३ च्या सरासरीने ७ गडी बाद केले आहेत. तसेच वनडे क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत एकूण ६० वनडे सामन्यात ५५ गडी बाद केले आहेत. यासोबतच त्याने खेळलेल्या ११ टी-२० सामन्यात १० गडी बाद केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाचे ‘महागुरु’ म्हणून द्रविड नव्हे तर शास्त्री आहेत श्रेष्ठ, आकडेवारी पाहून पटेल खात्री

सातत्याने दुर्लक्षित होत असलेल्या कुलदीपला कट्टर विरोधक पाकिस्तानी संघाच्या दिग्गजाने दिला ‘पुनरागमनाचा मंत्र’

रोहितच्या पत्नीचे विराटशी होते खास नाते, सिनेमा थिएटरबाहेर एकत्र दिसल्याने झाली होती खूप चर्चा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---