भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एमएस धोनी सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे. ऑगस्ट 2020 मध्ये त्याने आंतरराष्टीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाजाची जागा रिक्त झाली आहे आणि त्याची जागा कोणता खेळाडू घेईल? या चर्चेला उधाण आले आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी भारताच्या एका युवा प्रतिभावान खेळाडूला या जागेसाठी प्रमुख दावेदार असल्याचे सांगितले आहे.
ईशान किशन सर्वात मोठा दावेदार – एमएसके प्रसाद
भारतीय क्रिकेट संघात यष्टिरक्षक फलंदाजाच्या एका जागेसाठी अनेक स्पर्धक आहेत. केएल राहुल, संजू सॅमसन, रिषभ पंत, ईशान किशन असे अनेक खेळाडू या पदासाठी इच्छुक आहेत. पण एमएस धोनीची जागा भरून काढणे अवघड आहे. एमएसके प्रसाद यांनी टी20 आणि वनडे सामन्यातील सर्वात मोठा दावेदार म्हणून मुंबई इंडियन्सचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याचे नाव घेतले आहे.
ईशानला खेळताना पाहयला लोकं उत्सुक
ईशान किशनच्या क्षमतेबद्दल बोलताना एमएसके प्रसाद म्हणाले की, “या पॉकेट डायनामाइटला खेळपट्टीवर खेळताना पाहयला लोकं फार उत्सुक आहेत. आयपीएल 2020 चा हंगाम त्याच्यासाठी शानदार होता. प्रथम त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि नंतर तो सलामीला आला. यावरून तो किती अनुकूल आहे, हे लक्षात येते.”
…तर तो भारतीय क्रिकेट संघासाठी खास ठरेल
“संघाच्या गरजेनुसार स्वतःला बदलण्याची त्याच्यात क्षमता आहे. टी20 आणि वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाजाचा प्रबळ दावेदार म्हणून निश्चितपणे त्याला आगामी काळात स्थान मिळेल. जर त्याने चांगले यष्टिरक्षण केले आणि आयपीएलप्रमाणे फलंदाजी करत राहिला, तर तो भारतीय क्रिकेट संघासाठी खास ठरू शकतो.” असेही पुढे बोलताना प्रसाद म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
हा २ वर्षांपूर्वीचा ऑस्ट्रेलिया संघ नाही, भारतासमोर मोठे आव्हान उभे करु, प्रशिक्षकाचे मोठे भाष्य
आयपीएल २०२१ साठी केव्हा होणार लिलाव? बीसीसीआयने दिली फ्रेंचायजीना माहिती
भारतीय गोलंदाजांना स्टिव्ह स्मिथचं चॅलेंज, “जर मला शॉर्ट चेंडू टाकण्याचा विचार करत असाल तर…”
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर