जगभरात अनेक देशांनी टी20 लीग सुरू केल्या आहेत. त्यात इंग्लंडची टी20 ब्लास्ट, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग, भारतातील इंडियन प्रीमिअर लीग, दक्षिण आफ्रिकेतील एसए20 लीग, वेस्ट इंडिजमधील कॅरिबियन प्रीमिअर लीग आणि बऱ्याच लीगचा समावेश आहे. मात्र, या लीग क्रिकेटविषयी भारतीय संघाचा दिग्गज माजी कर्णधार सौरव गांगुली याने खळबळजनक विधान केले आहे. त्याच्या विधानाने क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत.
काय म्हणाला गांगुली?
सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा टी20 लीगला खेळाडूंची अधिक पसंती आहे, पण ती दीर्घकाळ टिकणार नाही. भविष्यात आर्थिकरीत्या मजबूत काही लीगच सुरू राहतील. जगभरात टी20 लीगची वाढती संख्या लक्षात घेता खेळाडू देशासाठी क्रिकेट खेळण्यापेक्षा फ्रँचायझी क्रिकेटला जास्त महत्त्व देत आहेत.
सौरव गांगुलीची भविष्यवाणी
बिग बॅश लीगपाठोपाठ आता यूएई आणि दक्षिण आफ्रिकेत लीगचे आयोजन केले जात आहे. याव्यतिरिक्त वर्षाच्या अखेरीस अमेरिकेतही एक लीग सुरू करण्याची योजना आहे. मात्र, या सर्वांवर माजी कर्णधार गांगुली एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, “आम्ही जगभरात होत असलेल्या लीगबाबत बोलत असतो. आयपीएल एकदम वेगळ्या प्रकारची लीग आहे. ऑस्ट्रेलियातही बिग बॅश लीग चांगली कामगिरी करत आहे. तसेच, इंग्लंडमध्येही द हंड्रेड लीगने चांगलं काम केलं. दक्षिण आफ्रिका लीगही चांगलं काम करत आहे.”
पुढे बोलताना गांगुली म्हणाला की, “या सर्व लीग त्या देशांमध्ये होत आहे, जिथे क्रिकेट सर्वाधिक लोकप्रिय आहे. माझा असा विश्वास आहे की, आगामी 4-5 वर्षांमध्ये काही लीगच शिल्लक राहतील आणि मला माहितीयेत की, त्या कोणत्या लीग आहेत.”
‘खेळाडूंनी देशासाठी खेळण्यास पसंती द्यावी’
बीसीसीआयचा माजी अध्यक्ष गांगुली म्हणाला की, “सध्या प्रत्येक खेळाडूला नवीन लीगमध्ये सामील व्हायचे आहे. मात्र, आगामी काळात त्यांना कळेल की, कोणती महत्त्वपूर्ण आहे. अशात लीग क्रिकेट खेळण्यापेक्षा देशासाठी खेळण्याला प्राधान्य दिले जाईल.” क्रिकेट प्रशासनाच्या महत्त्वावर जोर देत झिम्बाब्वेचे उदाहरण दिले, जिथे प्रशासकीय कारणांमुळे क्रिकेटला अपयश आले. तो म्हणाला की, “मी पाच वर्षे बंगाल क्रिकेट संघाचा अध्यक्ष राहिलो आणि पुन्हा तीन वर्षे बीसीसीआयचा अध्यक्ष राहिलो. मी आयसीसीमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, पाहिले आहे की, पायाभूत सुविधा आणि सहयोगानेच खेळ टिकणे शक्य आहे.”
आयपीएल जगातली सर्वोत प्रतिष्ठित लीग
इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल ही स्पर्धा 2008पासून सुरू झाली. आजपर्यंत या स्पर्धेचे 15 हंगाम पार पडले आहेत. विशेष म्हणजे, या स्पर्धेची लोकप्रियता जगभरात आहे. त्यामुळे आयपीएलची गणना जगातील सर्वात प्रतिष्ठित लीगमध्ये केली जाते. आयपीएल 2023 स्पर्धेचा हंगाम मार्च-एप्रिलमध्ये खेळला जाणार आहे. (former bcci president sourav ganguly says only a few cricket leagues will be left in the coming times)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वीच संजू सॅमसनचं नशीब फळफळलं! थेट ‘या’ संघाने सोपवली मोठी जबाबदारी
खराब गोलंदाजीमुळे बुमराहवर भडकलेला विराट, पण ‘या’ भारतीयाने मध्यस्थी करत म्हटले होते, ‘त्याला सोड…’